मुंबई। ब्रेबॉर्न स्टेडिअमवर आज (29 ऑक्टोबर) भारत विरुद्ध विंडीज संघात सुरु असलेल्या चौथ्या वनडे सामन्यात भारताचा धडाकेबाज सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने वनडेतील 21वे शतक साजरे केले. यावेळी त्याने सलग नऊ वनडे मालिकेत शतक करण्याचा पराक्रम केला आहे.
तसेच रोहितने आज विंडीज विरुद्ध 137 चेंडूत 162 धावा केल्या यावेळी त्याने 20 चौकार आणि 4 षटकार मारले.
आजच्या सामन्यात रोहितने वनडेमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मागे टाकत 198 षटकार खेचले.
सलग नऊ वनडे मालिकेत रोहित शर्माने केलेली शतके-
2017ला झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये न्युझीलंड विरुद्ध
2 शतक श्रीलंकेविरुद्ध श्रीलंकेत
1 ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारतात
1 न्युझीलंड विरुद्ध भारतात
1 श्रीलंकेविरुद्ध विरुद्ध भारतात
1 दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दक्षिण आफ्रिकेमध्ये
1 इंग्लंड विरुद्ध इंग्लंडमध्ये
1 एशिया कपमध्ये
2 विंडीज विरुद्ध भारतात
महत्त्वाच्या बातम्या:
–तब्बल अठरा वर्षांनंतर हा संघ खेळणार रणजी ट्रॉफी
–वन-डेत रोहित सचिनइतकाच हिट.. जाणुन घ्या काय आहे कारण?