गुरुवारी(3 जानेवारी) प्रो कबड्डी 2018-19 च्या मोसमात यूपी योद्धा विरुद्ध गुजराच फॉर्च्यूनजायट्ंस संघात क्वालिफायर 2 चा सामना पार पडला. या सामन्यात गुजरातने 38-31 अशा फरकाने यूपीचा पराभव करत सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली.
या सामन्यात यूपीला जरी पराभव स्विकारावा लागला असला तरी त्यांचा राइट कॉर्नर सांभाळणारा बचावपटू नितेश कुमारने मोठा पराक्रम केला आहे. त्याने या सामन्यात 6 टॅकल पॉइंट मिळवले, त्याचबरोबर त्याने या प्रो कबड्डीच्या मोसमात 100 टॅकल पॉइंट्लही त्याने पूर्ण केले.
प्रो कबड्डीच्या एका मोसमात 100 टॅकल पॉइंट मिळवणारा तो पहिलाच कबड्डीपटू ठरला आहे. याआधी कोणत्याच कबड्डीपटूला प्रो कबड्डीच्या एका मोसमात हा टप्पा गाठता आला नव्हता.
नितेशने प्रो कबड्डीच्या या सहाव्या मोसमात 25 सामन्यात 4 च्या सरासरीने 100 टॅकल पॉइंट्स मिळवले आहेत. त्याने या मोसमात 8 सुपर टॅकल केले असून तो सर्वाधिक सुपर टॅकल करण्याच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर त्याच्या नावावर 8 वेळा हायफायही नोंदवले गेले आहे.
प्रो कबड्डीच्या एका मोसमात सर्वाधिक टॅकल पॉइंट्स मिळवणारे कबड्डीपटू –
100 – नितेश कुमार (25 सामने) (मोसम – 6)
84 – परवेश भैंसवाल (24 सामने) (मोसम – 6)
83 – फजल अत्रचली (23 सामने) (मोसम – 6)
80 – सुरेंदर नाडा (21 सामने) (मोसम – 5)
76 – सुरजित सिंग (24 सामने) (मोसम – 5)
महत्त्वाच्या बातम्या:
–टीम इंडियाचे टेंशन वाढले, वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात झाले या खेळाडूंचे पुनरागमन
–Video: ‘तूला कंटाळा येत नाही का?’लायनचा पुजाराला प्रश्न