प्रो कबड्डीचा पहिल्या दिवसाचा लिलाव आज दिल्ली येथे पार पडला. ४ नवीन टीमच्या समावेशासह तब्बल ३५० खेळाडूंचा होणारा हा लिलाव उद्या संपेल. आधीच्या ८ पैकी ७ संघानी त्यांचा एक एलिट खेळाडू कायम ठेवला. या लिलावामध्ये सेनादलाच्या नितिन तोमरने नवा विक्रम रचताना तब्बल ९३ लाख रूपयांची किंमत मिळवली. मनजीत चिल्लरचा मागील विक्रम मोडत त्याला ही उचचांकी रक्कम मिळाली.
मनजीत चिल्लरला जयपूरने ७५.५० लाख लिलावात खरेदी केले. बचावपटू सुरजीत सिंगलाही ७३ लाखांची बोली लागली. सुरजीतला बेंगाल वॉरियर्सने विकत घेतले.
दक्षिण कोरियाच्या जान कून लीला बेंगाल वॉरियर्सने रेटाइन केल्यामुळे लिलावात भाग घेता आला नाही. त्याला ८०.३ लाख रक्कम मिळाली.
भारतीय अ श्रेणीतील अष्टपैलू खेळाडू राजेश नरवाल नव्याने दाखल झालेला संघ उत्तर प्रदेशकडे गेला. उत्तरप्रदेश त्यासाठी ६९ लाख रुपये मोजले. जयपूर संघमालक अभिषेक बच्चनने त्यासाठी भरपूर प्रयत्न केले परंतु उत्तरप्रदेश संघासमोर ते कमी पडले.
पहिल्या दिवशी १३१ खेळाडूंनी या लिलावात भाग घेतला होता. प्रत्येक संघाला १८- २५ घेता येऊ शकतात. जवळजवळ १६ देशातील ६० परदेशी खेळाडूंनी या लिलावात भाग घेतला आहे.
अव्वल भारतीय खेळाडू ‘अ’ गट (मुळ किंमत २० लाख)
– नितिन तोमर – उत्तर प्रदेश (९३ लाख)
– मनजीत चिल्लर – जयपूर (७५.५० लाख)
– राजेश नरवाल – यूपी (६९ लाख)
– संदीप नरवाल – पुणे (६६ लाख)
– कुलदीप सिंग – मुंबई (५१.५० लाख)
– रण सिंग – बंगाल (४७.५० लाख)
– राकेश कुमार – तेलगू (४५ लाख)
परदेशी खेळाडू :
‘ब’ गट (मुळ किंमत – १२ लाख)
अबोझर मोहजेरमिघनी – गुजरात (५० लाख)
अबोलफझेल मघसोद्लो – दिल्ली (३१.८० लाख)
फरहाद रहिमी मिलाघरदन – तेलगू (२९ लाख)
खोमसान थोंगखाम – हरियाणा (२०.४० लाख)
हादी ओस्तोरक – मुंबई (१८.६० लाख)
झिउर रहमान – पुणे (१६.६० लाख)
सुलेमान कबिर – यूपी (१२.६० लाख)
‘क’ गट (मुळ किंमत ८ लाख)
ताकामित्सु कोनो – पुणे (८ लाख)
योंगजू ओके – मुंबई (८.१० लाख)
डोंगगेआॅन ली – मुंबई (२० लाख)
मोहम्मद माघसौद्लू – पटणा (८ लाख)