---Advertisement---

‘एक दिवस असा खेळेन की सगळ्यांची तोंड बंद होतील,’ राणाने सांगितली पंतच्या वाईट दिवसांतील आठवण

On: शुक्रवार, जून 18, 2021 5:24 PM
---Advertisement---

भारतात क्रिकेट हा केवळ एक खेळ नसून लोकांच्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक आहे. सामना जिंकल्यावर जितके भारतीय समर्थक संघाला आणि खेळाडूंना डोक्यावर चढवतात तितकेच सामना हारल्यानंतर दु:खी सुद्धा होतात. अगदी दमदार प्रदर्शन करणाऱ्या युवा खेळाडूंमध्येही आजी-माजी खेळाडूंना शोधले जाते. परंतु, तोच खेळाडू खराब फॉर्ममध्ये असला की त्याच्यावर टिका केली जाते. याचा परिमाण त्या खेळाडूच्या प्रदर्शनावर होतो. असाच एक फलंदाज आहे, जो या सगळ्या गोष्टींचा सामना करून आज भारतीय संघाचा ‘एक्स फॅक्टर’ बनला आहे. तो म्हणजे रिषभ पंत.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज महेंद्र सिंग धोनी आणि सध्याचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत यांचात क्रिकेट समर्थक नेहमी तुलना करत आले आहेत. धोनी निवृत्त झाला असला तरीही समर्थक काही पंतची तुलना करण्यापासून पाठ सोडत नाहीत.

कोलकाता नाईट राइडर्स संघाचा सलामी फलंदाज नितीश राणाने या गोष्टीचा खुलासा करत म्हटले की, पंतला त्याची आणि धोनीची केलेल्या तुलनेबद्दल चिड येते.

पंत गेल्यावर्षी खराब फॉर्म म्हणून संघाच्या बाहेर काढण्यात आले होते. परंतु, या खेळाडूने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर स्वत:ला सिद्ध करून पुन्हा एकदा भारताच्या तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. पंतने आपल्या कारकिर्दीत झेलल्या बदलाचे श्रेय मेहनीतील दिले आहे.

राणाने इंडिया टिव्हीशी या गोष्टीवर चर्चा करताना सांगिले की, पंत जेव्हा कारकीर्दीच्या खराब फॉर्ममधून जात होता, तेव्हाही त्याचात तेवढाच आत्मविश्वास आणि दृढ निश्चय साफ झळकत होता. राणा सांगतो, “त्याची सर्वात मोठी ताकत म्हणजे त्याचा स्वत:वर असलेला विश्वास. त्याने कधीही स्वत:वरचा विश्वास सोडला नाही. आजवर त्याने जेवढे क्रिकेट खेळले आहे ते आत्मविश्वासाच्या बळावर. माझ्या अजूनही लक्षात आहे की, ज्यावेळेस लोक त्याची निंदा करत होते. तेव्हा त्याने मला सांगितले की, क दिवस अशी खेळी खेळीन की, हि सगळी लोक मला बोलायचे बंद होतील. आणि मला विश्वास आहे कि, हि खेळी मी लवकरच खेळणार आहे.

राणाने पुढे सांगितले की,”मला एकदा पंत म्हणाला होता की,धोनी एक महान खेळाडू आहे आणि मी त्याचा जवळपास सुद्धा नाही. मी महिभाईला खूप मानतो. पणमला हे समजत नाही आहे की, का ही लोकं माझी तुलना माहीभाई सोबत करतात. मी त्या तुलनेच्या लायक अजून झालेलो नाही. माझी बॅट, माझं कीट सगळं घेऊन जाऊदे पण माझी तुलना महिभाई सोबत नका करू. महिभाई माझ्यासाठी देवा सारखा आहे.”

महत्त्वाच्या बातम्या-

संधी मिळताच फलंदाजांने धारण केला ‘रुद्रावतार’, ४ चेंडूत ठोकले सलग ४ षटकार

युजवेंद्र चहलच्या पत्नीने केला ‘विरुष्का’सोबतचा फोटो शेअर; अनुष्काबद्दल बोलताना म्हणाली, ‘ती खूप…’

जेव्हा अव्वल गोलंदाज राशिदने खाल्ला होता सपाटून मार, इंग्लंडच्या फलंदाजांनी ठोकले होते ११ षटकार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---