भारतीय क्रिकेट बोर्ड टी२० विश्वचषकाची विशेष तयारी करत आहे. यामध्ये संघाने अधिक टी२० सामने खेळावे यासाठी बोर्ड मोठ्या प्रमाणात टी२० मालिका आयोजित करत आहेत. आता भारत टी२० बरोबरच वनडे विश्वचषकासाठीही नियोजन करत आहेत. यासाठी काही खास उपाययोजना तयार केल्या जात आहेत. त्याची सुरूवात पुन्हा एकदा फलंदाजीच्या क्रमवारीतील बदलाने होणार आहे.
भारताचा माजी सलामीवीर आणि संघ निवडकर्ता देवांग गांधी यांनी शुबमन गिल (Shubman Gill) याला २०२३च्या वनडे विश्वचषकासाठी तयार केले जात आहे, असे विधान केले आहे. त्यांनी म्हटले, “गिलने वेस्ट इंडिजच्या दौऱ्यात चमकदार खेळी केली, मात्र त्याला या विशेष दौऱ्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागेल.”
“तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणे हे टॉप ऑर्डरमधील महत्वाची जागा आहे. त्या खेळाडूला दुसऱ्या चेंडूवरही फलंदाजी करण्याची वेळ येऊ शकते. माझ्या मते केएल राहुल काही सामन्यानंतर मध्यम फळीत फलंदाजी करेल आणि गिलला २०२३च्या विश्वचषकासाठी तयार केले जाईल”, असेही गांधी यांनी पुढे म्हटले आहे.
गिलने क्रमांक तीनवर फलंदाजी करण्याची सुरूवात झिम्बाब्वे दौऱ्यात होण्याची शक्यता आहे. या दौऱ्यासाठी केएल राहुल (KL Rahul) याला संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. यामुळे भारतीय संघव्यवस्थापक सलामीला नवीन जोडी उतरवू शकतो. त्यातच गिलने वेस्ट इंडिज दौऱ्यातील वनडे मालिकेत चमकदार खेळी केली. अशातच त्याची टॉप ऑर्डरमध्ये जागा पक्की आहे. त्याला पहिल्या तीनमध्ये फलंदाजी करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. यावेळी केएल राहुल (KL Rahul) याच्यासोबत शिखर धवन (Shikhar Dhawan) किंवा धवन आणि गिल सलामीला येऊ शकतात.
गिलने वेस्ट इंडिज दौऱ्यात वनडेमध्ये सलामीला येताना उत्तम खेळी केली आहे. त्याने तीन सामन्यात अनुक्रमे ६४, ४३ आणि नाबाद ९८ धावा केल्या होत्या. त्याच्या या उल्लेखनीय खेळीने तो या दौऱ्यात मालिकावीर ठरला होता. हा २२ वर्षीय फलंदाज सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवत आहे. मात्र राहुलच्या येण्याने त्याची सलामीला येण्याची घोडदौड थांबण्याची शक्यता आहे. तो सलमीला नाही आला तर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल.
गिलने आतापर्यंत ६ वनडे सामन्यात ५०.८च्या सरासरीने २५४ धावा केल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कार्तिकची उपस्थिती पंतसाठी धोक्याची? युवा यष्टीरक्षक म्हणाला, ‘प्रशिक्षक आणि कर्णधार…’
‘इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूला आपल्या मायदेशासाठी खेळायचं होतं क्रिकेट!’ माजी कर्णधाराने केलाय खुलासा
बाबाचं दिडशतक प्रत्यक्षात पाहुन लेकीचा आनंद गगनात मावेना! पुजाराच्या मुलीचे व्हिडिओ व्हायरल