भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) क्रिकेटचा देव म्हटले जाते. तेंडुलकरनं आपल्या क्रिकेट कारकिर्दीत असे 5 रेकाॅर्ड केले आहेत जे सध्याच्या कोणत्याही फलंदाजाला मोडणे अशक्य आहे. सचिन तेंडुलकरनं 15 नोव्हेंबर 1989 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला. तेंडुलकरनं 24 वर्ष क्रिकेट जगतावर राज्य केलं. अनेक मोठमोठे रेकाॅर्ड त्याच्या नावावर केले. ज्याच्या आसपासही कोणी जाऊ शकत नाही.
तेंडुलकरनं त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकदिवसीय क्रिकेटमध्ये 18,426 धावा आणि कसोटीत 15,921 धावा केल्या आहेत. सचिन तेंडुलकरच्या नावावर 100 आंतरराष्ट्रीय शतके आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदा द्विशतक झळकावण्याचा रेकाॅर्ड सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. 24 फेब्रुवारी 2010 रोजी सचिननं एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिले द्विशतक झळकावले होते. तत्पूर्वी सचिन तेंडुलकरच्या त्या 5 विश्वविक्रमांवर एक नजर टाकूया जे मोडणे अशक्य आहे.
1) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा- सचिन तेंडुलकरनं (Sachin Tendulkar) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 34,357 धावा केल्या आहेत. त्याचा हा विश्वविक्रम मोडणे कोणत्याही फलंदाजाला अशक्य आहे. सचिन तेंडुलकरच्या विक्रमाजवळही कोणता फलंदाज नाही. तेंडुलकरनंतर कुमारा संगकारानं सर्वाधिक 28,016 धावा केल्या आहेत.
2) सर्वाधिक एकदिवसीय सामने खेळले- तेंडुलकरनं आपल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत सर्वाधिक 463 सामने खेळण्याचा विश्वविक्रम केला आहे. तेंडुलकरचा हा महान विक्रम आजपर्यंत जगातील कोणत्याही फलंदाजाला मोडता आलेला नाही. तेंडुलकरनं शेवटचा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना 18 मार्च 2012 रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळला. सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) एकदिवसीय आंतरराष्ट्रीय कारकीर्द 22 वर्षे 91 दिवसांची आहे.
3) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक चौकार- सचिन तेंडुलकरनं (Sachin Tendulkar) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4,076 हून अधिक चौकार मारले आहेत. सचिननं एकदिवसीय आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 2,016 चौकार, कसोटी कारकिर्दीत 2,058 चौकार आणि टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 2 चौकार मारले आहेत. सध्या खेळत असलेल्या खेळाडूंपैकी कोणताही फलंदाज 3,000 चौकार सुद्धा मारु शकला नाही.
4) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा- सचिन तेंडुलकरनं आपल्या 22 वर्ष 91 दिवसांच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 463 एकदिवसीय सामन्यांच्या 452 डावांमध्ये 44.83 च्या उत्कृष्ट सरासरीने 18,426 धावा केल्या आहेत. सध्या खूप कमी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले जात आहेत, त्यामुळे सचिन तेंडुलकरचा 18,426 एकदिवसीय धावांचा विश्वविक्रम मोडणे जवळजवळ अशक्य आहे.
5) एका वर्षात सर्वाधिक एकदिवसीय धावा- एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक एकदिवसीय धावा करण्याचा विश्वविक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिननं 1998 मध्ये एकदिवसीय सामन्यात 1.894 धावा करण्याचा विश्वविक्रम केला होता. 26 वर्षांपासून जगातील कोणताही फलंदाज सचिन तेंडुलकरचा हा विश्वविक्रम मोडू शकलेला नाही. 1998 मध्ये सचिन तेंडुलकरने 34 एकदिवसीय सामन्यांच्या 33 डावांमध्ये 65.31 च्या उत्कृष्ट सरासरीने 1894 धावा केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
ऑलिम्पिक पदक जिंकताच स्वप्नील कुसाळेचं प्रोमोशन, मध्य रेल्वेत आता ऑफिसर म्हणून काम करणार!
टी20 विश्वचषक झाला आता टीम इंडियाचे लक्ष विश्वचषकावर..! कर्णधारानं सांगितलं पुढचं नियोजन
एमएस धोनीला ‘थाला फॉर अ रिझन’ का म्हणतात? अखेर माहीने सांगितली त्यामागची कहाणी