भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) याने काही दिवसांपूर्वीच क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. यानंतर तो अनेकदा विविध कारणांनी चर्चेत आला आहे. नुकतेच आता त्याने भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीबरोबरच्या (MS Dhoni) आपल्या संबंधांबद्दल भाष्य केले आहे. हरभजन धोनीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाकडून आणि चेन्नई सुपर किंग्सकडून खेळला आहे.
हरभजनने म्हणल्याप्रमाणे त्याच्यात आणि धोनीमध्ये मतभेद नाही. लोक त्याच्या व्यक्तव्यांचा चूकीचा अर्थ घेतात. तसेच हरभजनने म्हणले आहे की, त्याच्यावर धोनीने नाही, तर बीसीसीआयकडून अन्याय झाला आहे.
खरंतर हरभजनने निवृत्ती घेतल्यानंतर म्हटले होते की, त्याच्या संघर्षाच्या दिवसांमध्ये त्याची बीसीसीआयने साथ दिली नव्हती. हरभजनच्या या व्यक्तव्याचा अर्थ अनेकांनी असा घेतला की, धोनीने हरभजनवर अन्याय केला. हरभजन २०१६ साली भारताकडून अखेरचा सामना खेळला होता. तसेच तो २०११ वनडे विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचाही भाग होता.
त्याने न्यूज १८ शी बोलताना धोनीबरोबरच्या संबंधाबद्दल (Harbhajan Dhoni Relation) सांगितले की, ‘माझी एमएस धोनीबद्दल काहीही तक्रार नाही. खरं हे आहे की तो इतक्या वर्षात माझा चांगला मित्र झाला आहे. माझी तक्रार बीसीसीआयबद्दल आहे. त्यावेळच्या बीसीसीआय मॅनेजमेंटची माझी तक्रार आहे. त्यावेळीच्या निवडकर्त्यांनी आपल्या कामाला न्याय दिला नाही. त्यांनी कधीही संघाला एकत्र होऊ दिले नाही.’
तो पुढे म्हणाला, ‘हे पाहा, माझ्या व्यक्तव्यांचा लोकांनी वेगळा अर्थ काढला. मी फक्त एवढंच सांगू इच्छित होतो की, २०१२ नंतर अनेक गोष्टी चांगल्या होऊ शकत होत्या. सेहवाग, मी, युवराज, गंभीर आम्ही सर्व भारतीय संघाकडून खेळून निवृत्त होऊ शकत होतो. कारण, सर्वचजण तेव्हा आयपीएल खेळायचे आणि सक्रीय होते. हे जरा विचित्र आहे की, २०११ सालच्या विश्वविजेत्या संघातील खेळाडू नंतर एकत्र खेळले नाही. असं का झालं? त्या संघातील केवळ काहीच खेळाडूंना २०१५ सालच्या विश्वचषकात खेळण्याची संधी मिळाली.’
अधिक वाचा – क्रिकेटची इनिंग संपली, आता राजकारणात प्रवेश? आणि पक्ष कोणता? सर्व प्रश्नांवर स्वतः हरभजनने केला खुलासा
हरभजन सिंगची कारकिर्द
साल १९९८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या हरभजन सिंगने १०३ कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ३२.४६ च्या सरासरीने ४१७ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने २ शतकांसह २२२४ धावाही केल्या आहेत. तो कसोटीत ४०० पेक्षा अधिक विकेट्स घेणारा भारताचा दुसरा गोलंदाज होता.
त्याचबरोबर २३६ वनडे सामन्यांमध्ये त्याने ३३.३५ च्या सरासरीने २६९ विकेट्स घेतल्या आहेत आणि १२३७ धावा केल्या आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर २८ टी२० सामनेही खेळले असून २५ विकेट्स घेतल्या आहेत.
व्हिडिओ पाहा – टीम इंडियाला सोडलं, पण एअरपोर्टवर एकट्या हरभजनला पकडलं
त्याचबरोबर आयपीएलमध्ये हरभजनने १६३ सामने खेळले असून १५० विकेट्स घेतल्या आहेत. तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघांकडून खेळला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
श्रीजेशने वाढविला देशाचा गौरव! पटकावला क्रीडाविश्वातील सर्वोच्च पुरस्कार
‘या’ कारणामूळे स्टार्कने घेतली मेगा लिलावातून माघार; म्हणाला…
कडक! फुल टॉस चेंडूवर राशिदने खेचला ‘नो लूक’ षटकार, व्हिडिओ पाहा