टी20 विश्वचषक (T20 World Cup) 2022चा हंगाम ऑस्ट्रेलियात खेळला जात आहे. हा हंगाम सर्वाधिक चर्चेत आला, त्याला कारणही तसेच आहे. पहिले तर दोन वेळेचा विजेता वेस्ट इंडिज बाहेर झाला तर बाकी चॅम्पियन्स संघानीही किमान एकतरी सामना गमावला. त्याचबरोबर ज्या-ज्या देशांनी याचे यजमानपद घेतले ते-ते देश त्यावेळच्या स्पर्धेचे विजेते झालेच नाही. अशा या आठव्या टी20 विश्वचषकात भारत उपांत्य फेरीत पोहोचला. या सामन्यात त्यांची गाठ गुरूवारी (10 नोव्हेंबर) इंग्लंडशी पडणार आहे. हा सामना ऍडलेडच्या ओव्हलवर खेळला जाणार आहे. या मैदानावर एक विक्रम असा आहे जो दोन्ही संघाच्या विजयात महत्वाची भुमिका बजावू शकतो.
ऍडलेडच्या ओव्हल मैदानावर आतापर्यंत 11 टी20 सामने खेळले गेले. पहिला सामना ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यात 2011मध्ये खेळला गेला. हा सामना इंग्लंडने एक विकेट राखत जिंकला. यामध्ये महत्वाची बाब म्हणजे या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दुसरा सामना 3 वर्षानंतर म्हणजे 2014मध्ये खेळवण्यात आला. यामध्ये ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत दक्षिण आफ्रिकेला प्रथम गोलंदाजी करण्यास सांगितले आणि ऑस्ट्रेलियाने हा सामना 7 विकेट्सने गमावला.
नाणेफेक जिंकत सामना गमावण्याचे सत्र पुढील 9 सामन्यात सुरूच राहिले. याचा अर्थ असा की ज्या संघाने टी20 सामन्यात ओव्हलवर नाणेफेक जिंकली त्याच संघाने सामने गमावले आहेत. चालू स्पर्धेत या मैदानावर 6 सामने खेळले गेले. तसेच भारताने येथे 2 सामने खेळले आहेत. ते दोन्ही सामने भारताने नाणेफेक गमावत जिंकले. यातील पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2016मध्ये खेळला होता, तो सामना भारताने 37 धावांनी जिंकला. त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी केली होती. दुसरा सामना बांगलादेश विरुद्ध याच स्पर्धेत खेळला. त्यामध्येही नाणेफेकीबाबतची पुनरावृत्ती झाली आणि भारताने डकवर्थ लुईसच्या नियमानुसार 5 धावांनी जिंकला.
या मैदानावर 11 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले गेले. ते सर्वच्या सर्व सामने नाणेफेक गमावणाऱ्या संघाने जिंकले. यामुळे रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि जोस बटलर (Jos Buttler) यांना गुरूवारी खेळल्या जाणाऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकावी नाहीतर हरावी लागणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
T20 WC Semi-Final: मार्क वूड, डेविड मलान भारताविरुद्ध खेळणारच! खुद्द कॅप्टन बटलरने दिले संकेत
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात विराट-रोहितला इतिहास रचण्याची संधी, दोन्ही संघ 35 वर्षांनंतर उपांत्य फेरीत भिडणार