क्रिकेटमध्ये नाणेफेक ही महत्त्वाची बाब आहे. ही पद्धत जगात सगळ्या क्रिकेटमध्ये वापरली जात आहे. मात्र ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगने यावर एक दुसरा मार्ग शोधला आहे.
19 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या या लीगच्या आठव्या हंगामात नाणेफेक एेवजी बॅटफेक होणार आहे. नाणेफेकप्रमाणे छापा कि काटाच्या बाजूवरून संघ निर्णय घेत होते. आता बॅटफेकमध्ये हील्स (बॅटचा उंचवटा भाग) कि फ्लॅट (बॅटची पुढची बाजू) यावरून संघ निर्णय घेणार आहेत.
“माझ्यासाठी ही खुप मोठी आनंदाची गोष्ट आहे. बॅकयार्ड क्रिकेटमध्ये जशी बॅटफेक केली जाते. तीच पद्धत येथे वापरली जाणार आहे” , असे बिग बॅश लीगचे प्रमुख किम मॅकोनी म्हणाले.
नाणेफेकी प्रमाणे बॅटही वर फेकली जाणार आहे. बॅटची पुढची बाजूच जमिनीवर पडेल मग संघाचे कोणतेच कर्णधार हील्स ही बाजू निवडणार नाही, यासाठी एका विशिष्ठ बॅटचा वापर केला जाणार आहे असे मॅकोनी यांनी सांगितले.
“या बॅटसाठी आम्ही कुकाबुरा या कंपनीशीही बोललो आहे. ही एक वेगळी बॅट असणार आहे. यामुळे बॅटफेकीत दोन्ही बाजूंना समान संधी असणार आहे”, असे मॅकोनी म्हणाले.
ब्रिस्बेन हीटचा कर्णधार ख्रिस लीन याला या पहिली बॅटफेकची संधी मिळणार आहे. त्यांचा सामना अॅडलेड स्ट्रायकर विरुद्ध गॅबा येथे होणार आहे.
The coin toss in the KFC Big Bash League is no more, with captains instead facing a decision between ‘hills’ and ‘flats’: https://t.co/DoftHKEqvh pic.twitter.com/5VRYHQtzq7
— cricket.com.au (@cricketcomau) December 11, 2018
महत्त्वाच्या बातम्या:
–ISL 2018: पुण्याची गोव्याविरुद्ध लागणार कसोटी
–कसोटीमध्ये २०१८ वर्षातील षटकार किंग होण्याची रिषभ पंतला संधी
–हॉकी विश्वचषक २०१८: तिसऱ्यांदाच विश्वचषकात खेळणाऱ्या फ्रान्सची उपांत्यपूर्व फेरीत धडक