कोलकता। बुधवारी पार पडलेल्या आयपीएल 2018च्या एलिमिनेटरमध्ये कोलकता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्सवर २५ धावांनी विजय मिळवला.
या सामन्यात कोलकाताच्या आंद्रे रसेलने तुफानी फटकेबाजी करताना ३ चौकार आणि ५ षटकारांसह २५ चेंडूत नाबाद ४९ धावा केल्या. त्याचबरोबर त्याने यावर्षीच्या आयपीएल मोसमात ३१ षटकारही पूर्ण केले.
आयपीएलच्या या ११ व्या मोसमात ३० किंवा त्यापेक्षा जास्त षटकार मारणारा तो तब्बल सहावा खेळाडू ठरला. ११ आयपीएलमध्ये पहिल्यांदाच ६ खेळाडूंनी ३० पेक्षा जास्त षटकार मारले आहेत.
या मोसमात रिषभ पंत, अंबाती रायडू, केएल राहुल, आंद्रे रसेल, एबी डीव्हिलियर्स आणि एमएस धोनी या खेळाडूंनी ३० किंवा ३० पेक्षा जास्त षटकार खेचले आहेत.
याआधी फक्त २०१६ मध्ये ३ खेळाडूंनी ३० पेक्षा जास्त षटकार मारले होते. मागील १० आयपीएल मोसमात कधीही एका मोसमात ३ पेक्षा जास्त खेळाडूंनी ३० किंवा ३० पेक्षा जास्त षटकार खेचलेले नाही.
यावर्षी आयपीएलमध्ये चक्क ६ खेळाडूंनी ३०पेक्षा जास्त षटकार खेचले आहेत. यापुर्वी फक्त एकदाच ३ खेळाडूंनी अशी कामगिरी केली होती. आयपीएल फक्त बॅटिंग लीग तर नाही होत ना? #म #मराठी #ipl #IPL2018 @MarathiBrain @MarathiRT @Mazi_Marathi @kridajagat @Maha_Sports
— Sharad Bodage (@SharadBodage) May 23, 2018
एका आयपीएल मोसमात ३० किंवा ३० पेक्षा जास्त षटकार मारणाऱ्या खेळाडूंची संख्या:
2008 – 1
2009 – 0
2010 – 0
2011 – 1
2012 – 1
2013 – 1
2014 – 2
2015 – 1
2016 – 3
2017 – 0
2018 – 6
महत्त्वाच्या बातम्या-
-सचिन, रोहितनंतर मोठा पराक्रम करण्याची संधी मुंबईकर रहाणेकडून हुकली!
-भारतीयांचं सर्वाधिक प्रेम मिळालेला परदेशी खेऴाडू आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
–आणि एबी डीविलियर्सचे ते स्वप्न अखेर अपुर्णच राहिलं!