भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यानच्या तिसऱ्या कसोटीला बुधवारी (२४ फेब्रुवारी) अहमदाबाद येथे सुरुवात झाली आहे. चार सामन्यांच्या मालिकेतील हा सामना जगातील सर्वात मोठे स्टेडियम असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळविला जातोय. भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आपल्या कारकिर्दीतील शंभरावा कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला. भारताकडून १०० कसोटी सामने खेळणारा तो अकरावा क्रिकेटपटू बनला.
यासह क्रिकेट जगतात १०० कसोटी सामने खेळणारा अवघा सत्तरावा खेळाडू होण्याचा सन्मान त्याला मिळाला. आज आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० कसोटी सामने खेळणाऱ्या सर्व खेळाडूंविषयी जाणून घेणार आहोत.
१) इंग्लंड
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इंग्लंडच्या सर्वाधिक खेळाडूंनी १०० कसोटी सामने खेळले आहेत. इंग्लंडचा तब्बल १५ खेळाडूंनी हा जादुई आकडा गाठला आहे.
इंग्लंडसाठी १०० कसोटी सामने खेळणारे खेळाडू-
ऍलिस्टर कुक, जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड, ऍलेक स्टुअर्ट, इयान बेल, ग्रॅहम गूच, डेव्हिड गावर, माईक आथरटन, कॉलिन काऊड्री, जेफ्री बॉयकॉट, केविन पीटरसन, इयान बोथम, जो रूट, अँड्रु स्ट्रॉस, ग्रॅहम थॉर्प.
२) ऑस्ट्रेलिया
इंग्लंड पाठोपाठ ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी सर्वाधिक १०० कसोटी सामन्यात उतरण्याचा मान मिळवला. आत्तापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या १३ खेळाडूंनी १०० किंवा त्याहून अधिक कसोटी सामने खेळले आहेत.
ऑस्ट्रेलियासाठी १०० कसोटी खेळणारे क्रिकेटपटू-
रिकी पॉंटिंग, स्टीव वॉ, मार्क वॉ, मायकल क्लार्क, जस्टीन लॅन्गर, मॅथ्यू हेडन, मार्क टेलर, शेन वॉर्न, ग्लेन मॅकग्रा, इयान हिली व नॅथन लायन.
३) भारत
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया नंतर भारताच्या सर्वाधिक ११ खेळाडूंनी शंभर आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यांमध्ये भाग घेतला आहे.
भारतासाठी १०० कसोटी सामने खेळणारे क्रिकेटपटू-
सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्ही व्ही एस लक्ष्मण, सौरव गांगुली, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, अनिल कुंबळे, हरभजन सिंग, कपिल देव, वीरेंद्र सेहवाग व इशांत शर्मा.
४) वेस्ट इंडीज
कधीकाळी क्रिकेट जगतावर राज्य करणाऱ्या वेस्ट इंडिज संघाचे ९ क्रिकेटपटू हे १०० पेक्षा अधिक कसोटी सामने खेळले आहेत.
वेस्ट इंडीजसाठी १०० कसोटी खेळलेले क्रिकेटपटू-
शिवनारायण चंद्रपॉल, कर्टनी वॉल्श, विवियन रिचर्ड्स, डेस्मंड हेन्स, क्लाईव्ह लॉईड, गॉर्डन ग्रिनिच, ख्रिस गेल व कार्ल हूपर.
५) दक्षिण आफ्रिका
जवळपास २२ वर्षाच्या निलंबनानंतर पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केलेल्या दक्षिण आफ्रिका संघाचेही ८ क्रिकेटपटू १०० हून आदर कसोटी सामने खेळलेले आहेत.
दक्षिण आफ्रिकेसाठी १०० कसोटी खेळणारे क्रिकेटपटू-
जॅक कॅलिस, मार्क बाऊचर, हाशिम आमला, ग्रॅमी स्मिथ, एबी डिव्हिलियर्स, शॉन पोलॉक, गॅरी कस्टर्न व मखाया एन्टिनी.
६) पाकिस्तान
भारतीय उपखंडातील पाकिस्तानच्या क्रिकेट संघातील ५ खेळाडूंनी देखील १०० आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केले आहे.
पाकिस्तानसाठी १०० कसोटी खेळणारे क्रिकेटपटू-
जावेद मियांदाद, इंजमाम उल-हक, युनूस खान, वसीम अक्रम व सलीम मलिक.
७) न्यूझीलंड
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी ४ न्यूझीलंडच्या खेळाडूंनी १०० आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळले आहेत.
न्यूझीलंडसाठी १०० कसोटी खेळणारे क्रिकेटपटू-
डॅनियल व्हेटोरी, स्टीफन फ्लेमिंग, रॉस टेलर व ब्रेंडन मॅक्युलम.
महत्त्वाच्या बातम्या –
घरचे मैदान अक्षरसाठी लाभदायी! ‘या’ दिग्गजांच्या यादीत मिळवले स्थान
इंग्लंडला पहिला विश्वचषक मिळवून देणारा ‘ओवेस शाह’
इशांतची शंभरी! कारकिर्दीतील महत्त्वाच्या सामन्यात खेळताना केले ‘हे’ मोठे विक्रम