क्रिकेटमध्ये अनेक नवीन रेकाॅर्ड बनतात, तर अनेक जुने रेकाॅर्ड तुटतात देखील. पण काहीआंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये काही दिग्गजांचे रेकाॅर्ड्स असे आहेत, जे आतापर्यंत कोणताही फलंदाज मोडीत काढू शकला नाही. तत्पूर्वी जगातील महान क्रिकेटपटूंपैकी एक असलेला वेस्ट इंडिजचा विव्ह रिचर्ड्स (Viv Richards) त्याच्या विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जात होता. वेस्ट इंडिजच्या या दिग्गज खेळाडूने आपल्या आक्रमक फलंदाजीने गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले.
विव्ह रिचर्ड्स (Viv Richards) क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक मानला जातो. 15,000 हून अधिक आंतरराष्ट्रीय धावा करणाऱ्या या दिग्गज फलंदाजाने अनेक रेकाॅर्ड तर मोडीत काढलेच पण त्याचा एक रेकाॅर्ड असा आहे जो आजही कायम आहे. 48 वर्षे पलटून गेली पण आजपर्यंत जगातील एकही फलंदाज तो मोडून काढण्यात यशस्वी झालेला नाही.
रिचर्ड्सच्या रेकाॅर्डबद्दल बोलायचे झाले, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सलग अर्धशतके मारण्याचा रेकाॅर्ड त्याच्या नावावर आहे. जॉन एरिकला मागे टाकून रिचर्ड्सने 1976 मध्ये हा रेकाॅर्ड केला, जो आजपर्यंत कोणीही मोडू शकले नाही. रिचर्ड्सने सलग 12 सामन्यात अर्धशतके झळकावली, तर 10 कसोटी सामने आणि 2 एकदिवसीय सामन्यांमध्ये सलग अर्धशतकांचा हा रेकाॅर्ड केला. याआधी हा रेकाॅर्ड जॉन एरिकच्या नावावर होता, ज्याने सलग 11 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अशी कामगिरी केली होती.
विव्ह रिचर्ड्सचा एक रेकाॅर्ड असा आहे, जो 40 वर्षांपासून कोणी मोडू शकला नाही. एकदिवसीय सामन्यादरम्यान त्याने हा रेकाॅर्ड केला. वास्तविक, रिचर्ड्स हा एकदिवसीय सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वात मोठी खेळी खेळणारा फलंदाज आहे. 1984 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात त्याने नाबाद 189 धावा केल्या होत्या, जेव्हा संघातील इतर कोणत्याही फलंदाजाला 30 धावाही करणे शक्य झाले नव्हते.
रिचर्ड्सच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने वेस्ट इंडिजसाठी 121 कसोटी, 187 एकदिवसीय सामने खळले आहेत. रिचर्ड्सने 121 कसोटी सामन्यात 50.23च्या सरासरीने 8,540 धावा केल्या. कसोटीमध्ये त्याने 45 अर्धशतके आणि 24 शतके झळकावली आहेत. दरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या 291 राहिली आहे. 187 एकदिवसीय सामन्यात त्याने 47च्या सरासरीने 6,271 धावा केल्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 45 अर्धशतके आणि 11 अर्धशतके झळकावली आहेत. दरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 189 राहिली.
महत्त्वाच्या बातम्या-
बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी रोहितची जंगी तयारी, जिममध्ये गाळतोय भरपूर घाम
मुंबई इंडियन्सची कॅप्टन्सी पुन्हा रोहितकडे? गणेश चतुर्थीला दिली हिंट
बीसीसीआयच्या ‘या’ नियमावर भडकला अश्विन, केले खळबळजनक वक्तव्य