न्यूझीलंड आणि भारत यांच्या दरम्यान 18 नोव्हेंबरपासून मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिका खेळल्या जाणार आहेत. या मालिकेसाठी भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये पोहोचला असून, भारतीय संघाने विश्रांतीला प्राधान्य दिले आहे. दुसरीकडे न्यूझीलंडने देखील आपल्या संघाची घोषणा केली. मात्र, या संघात अनुभवी वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट व दिग्गज सलामीवीर मार्टिन गप्टिल यांना जागा मिळाली नाही.
न्यूझीलंड आणि भारत यांच्या दरम्यान प्रत्येकी तीन सामन्यांची वनडे व टी20 मालिका खेळली जाईल. या मालिकेसाठी न्यूझीलंडच्या संघाचे नेतृत्व केन विलियम्सन हाच करेल. नुकत्याच झालेल्या टी20 विश्वचषकात न्यूझीलंड संघाने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारलेली. त्या विश्वचषकातील अनेक चेहरे या मालिकेतही दिसतील. मात्र, न्यूझीलंडसाठी सर्वोत्तम गोलंदाजी करणारा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट हा संघात जागा बनवू शकला नाही. विश्वचषकात 8 बळी मिळवणाऱ्या बोल्टने ऑगस्ट महिन्यात न्यूझीलंड बोर्डाचा केंद्रीय करार स्वीकारला नव्हता. त्या ऐवजी त्याने जगभरातील इतर लीग खेळण्यास प्राधान्य दिले आहे. न्यूझीलंडचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी त्याच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती.
न्यूझीलंडचा अनुभवी सलामीवीर मार्टिन गप्टिल याला देखील या मालिकेसाठी संघात स्थान मिळाले नाही. त्याला वगळण्यात आले असून आता त्याची कारकीर्द संपल्यात जमा आहे. युवा सलामीवीर फिन ऍलन याने विश्वचषकात तुफान कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यामुळे भविष्यात तोच न्यूझीलंड संघासाठी खेळताना दिसेल. गप्टिल आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये तिसऱ्या स्थानी आहे.
भारताविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी न्यूझीलंड संघ-
केन विलियम्सन (कर्णधार), डेवॉन कॉनवे, फिन ऍलन, ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसलेल, जिमी निशाम, मिचेल सॅंटनर, ईश सोढी, टीम साऊदी, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर व ऍडम मिल्ने.
(No Place For Boult And Guptil In Newzealand Side Against India)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेपूर्वी कर्णधार हार्दिक करतोय एन्जॉय! शर्टलेस फोटो झाले व्हायरल
संघाची विस्कटलेली घडी बसवण्यासाठी बीसीसीआयची धडपड, भारताच्या टी20मध्ये धोनीला मिळू शकते मोठी भूमिका