2023मधील कामगिरीच्या आधारावर क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये चांगेल प्रदर्शन करणाऱ्यांची दखल आयसीसीकडून घेतलीगेली आहे. शुक्रवारी आयसीसीने टेस्ट क्रिकेटर ऑफ द ईअर पुरस्कारासाठी नामांकने जाहीर केली. यामध्ये भारताचा रविचंद्रन अश्विन, ऑस्ट्रेलियाचा ट्रेविस हेड आणि उस्मान ख्वाजा याचसोबत इंग्लडच्या जो रुटच्या नावाचा देखिल समावेश आहे. या सर्वांनीच मागील वर्षात कसोटी क्रिकेट मध्ये उत्तम कामगीरी केली.
रविचंद्रन अश्विन –
भारताचा फिरकी गोलंदाच रविचंद्रन अश्विन याच्याकडे हा बहुमान दुसऱ्यांदा जिंकण्याची संधी आहे. त्याने यापुर्वी 2016 मध्ये हा पुरस्कार आपल्या नावे केला होता. यासोबतच 2021 मध्ये प्रमुख दावेदारांच्या यादीत त्याच नाव होत. अश्विनने 2023 या वर्षात एकूण 7 कसोटी सामने खेळले. यामध्ये 41 विकेटसोबत फलंदाजीत 150 धावांचे योगदान त्याने दिले. अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत सर्वाधिक विकेट घेतल्या होत्या.
ट्रेविस हेड –
ऑस्ट्रेलियाच्या ट्रेविस हेड याचेही मागील वर्ष चांगले राहीले. मागच्या वर्षी जवळपास सर्वच महत्वाच्या मालिका आणि स्पर्धांमध्ये हेडची भूमिका ऑस्ट्रेलियासाठी महत्वाची राहिली. या डावखुऱ्या फलंदाजाने 2023 या वर्षात 12 सामन्यांमध्ये 919 धावा जमवत तो सर्वात जास्त धावा बनवणाऱ्या खेळाडुंच्या यादित तिसऱ्या क्रमांकावर राहिला. त्याने संपुर्ण वर्षात कसोटी मालिकांमध्ये आपली ताकद दाखवली आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2021-23 च्या अंतिम सामन्यात भारताविरुद्ध शतकीय खेळी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. यासोबतच त्याच्या नावे 4 विकेटही राहिल्या.
उस्मान ख्वाजा –
ऑस्ट्रेलियाच्या उस्मान ख्वाजा याचेही प्रदर्शनही मागील वर्षी उत्तम राहीले. त्याने सलामी फलंदाज म्हणून सातत्याने चांगली भुमिका पार पाडली. भारत दौऱ्यावर असताना दोन्ही संघाच्या खेळाडूंमध्ये त्याची सर्वाधीक धावसंख्या होती. त्याने एकूण 12 सामन्यांमध्ये 1210 धावा केल्या.
जो रुट –
इंग्लडचा माजी कर्णधार जो रुट याच्याकडे दुसऱ्यांदा प्लेअर ऑफ द ईयर बनवण्याची संधी आहे. याआधी त्याने 2021 या वर्षात हा पुरस्कार आपल्या नावे केलेला. मागच्या वर्षभरात त्याने 8 कसोटी सामन्यांमध्ये 787 धावा आणि 8 विकेट मिळवल्या. (Nominations announced for ICC Test Player of the Year)
महत्वाच्या बातम्या –
BREAKING: अंबाती रायुडूची 9 दिवसांच्या राजकारणातून निवृत्ती, YSRCP सोडून दिला सर्वांना आश्चर्याचा धक्का
Ranji Trophy: भाव ‘कैफ’च्या रणजी पदार्पणावर मोहम्मद शमीची भावनिक पोस्ट; म्हणाला, ‘मोठ्या संघर्षानंतर अखेर…’,