क्रिकेटचा सर्वात नवा प्रकार म्हणून उदयास आलेल्या ‘द हंड्रेड’ या स्पर्धेमध्ये गुरुवारी (१२ ऑगस्ट) एक नवा विक्रम प्रस्थापित केला गेला. नॉदर्न सुपरचार्जर्स विरुद्ध मॅंचेस्टर ओरिजनल्स यांच्या दरम्यान ‘द हंड्रेड’ लीगमध्ये झालेल्या सामन्यात नॉदर्न सुपर चार्जर्सच्या संघाच्या फलंदाजांनी तुफान फटकेबाजी करत स्पर्धेतील सर्वात मोठ्या धावसंख्येची नोंद केली. तसेच, धावांच्या बाबतीत सर्वात मोठा विजय देखील मिळवला.
सुपरचार्जर्सच्या फलंदाजांची टोलेजंग फटकेबाजी
हेडिंग्ले येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात मॅंचेस्टर ओरिजनल्सचा कर्णधार कार्लोस ब्रेथवेटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सुपरचार्जर्सचे आघाडीचे तीन फलंदाज पहिल्या ३४ चेंडूंमध्ये केवळ ५५ धावा बनवू शकले होते. मात्र, त्यानंतर सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या जॉन सिम्पसन याने आक्रमक फटकेबाजीचा उत्कृष्ट नमुना सादर केला. त्याने केवळ २८ चेंडूमध्ये ११ चौकार व २ षटकारांच्या मदतीने नाबाद ७१ धावा ठोकल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट २५३ असा होता. अखेरच्या चेंडूवर फलंदाजीला आलेल्या ब्रायडन कार्स याने चौकार ठोकत संघाला २०० धावांची मजल मारून दिली. ‘द हंड्रेड’ लीगमध्ये कोणत्याही संघातर्फे बनलेली ही सर्वाधिक धावसंख्या ठरली. मॅंचेस्टरसाठी स्टीवन फिन व लॉकी फर्ग्युसन यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.
मॅंचेस्टरचे फलंदाज ठरले अपयशी
सुपरचार्जर्सकडून मिळालेले २०१ धावांचे आव्हान जोस बटलरच्या अनुपस्थितीत मॅंचेस्टर संघाला पेलवलेच नाही. फिल सॉल्ट, जो क्लार्क व कॉलिन मुन्रो हे मँचेस्टरचे प्रमुख फलंदाज अपयशी ठरले. कर्णधार ब्रेथवेट हा मँचेस्टरसाठी सर्वाधिक धावा (२१) बनवणारा फलंदाज ठरला. मॅंचेस्टरचा डाव ९९ चेंडूमध्ये १३१ धावांवर संपुष्टात आला. बेन रेनने सुपरचार्जर्ससाठी सर्वाधिक तीन बळी मिळविले. फिरकीपटू आदिल रशीद व कर्णधार डेव्हिड विलीने प्रत्येकी दोन बळी आपल्या नावे केले. सुपरचार्जर्सने ६९ धावांनी मिळवलेला विजय स्पर्धेतील सर्वात मोठा विजय ठरला.
महत्त्वाच्या बातम्या-
https://mahasports.in/shefali-varma-smashed-halpcentury-in-hundred-league-of-england/amp/
https://mahasports.in/england-pacer-tymal-mills-clean-bowled-joe-clarke-in-the-hundred-match/amp/
https://mahasports.in/birmingham-phoenix-won-over-oval-invincibles/amp/
https://mahasports.in/mohammad-aamir-stormed-into-david-wiley-rained-sixes-in-the-last-over/amp/