---Advertisement---

काय सांगता! टी20 विश्वचषकात खेळणारा एकही भारतीय खेळाडू आयपीएलच्या फायनलमध्ये नाही!

On: शनिवार, मे 25, 2024 3:38 PM
Indian-Cricket-Team
---Advertisement---

सनरायझर्स हैदराबादनं राजस्थान राॅयल्सवर विजय मिळवून आयपीएल 2024 च्या फायनलसाठी स्थान निश्चित केलं. आयपीएल 2024 चा फायनल सामना रविवारी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये रंगणार आहे. केकेआर आणि हैेदराबाद दोन्ही संघांनी येणाऱ्या सर्व अडचणींवर मात करत फायनलसाठी स्थान निश्चित केलं. यादरम्यानं आगामी टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघातील कोणते खेळाडू आधी रवाना होणार आहेत. आणि कोणते खेळाडू नंतर? आता भारतीय संघ टी20 विश्वचषकासाठी एकाच फ्लाइटनं अमेरिकेला जाऊ शकतो.

आयपीएल फायनल आणि भारताच्या टी20 विश्वचषक संघाचा योगायोग रोमांचक झाला आहे. खरतर बीसीसीआयनं निश्चित केलं होतं की, टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघातील ज्या खेळाडूंची निवड केली आहे. ते खेळाडू दोन टप्प्यात अमेरिकेला रवाना होतील. क्रिकेट बोर्डाच्या नियोजनानुसार ज्या भारतीय खेळाडूंचा संघ आयपीएल फायनल मध्ये पोहोचणार नाही. ते (25 मे) रोजी टी20 विश्वचषकासाठी अमेरिकेला रवाना होतील. तर ज्या खेळाडूंचा आयपीएल 2024 चा फायनल सामना आहे. त्या खेळाडूंच नाव टी20 विश्वनचषकाच्या यादीत असेल, त्या खेळाडूंसाठी (27 मे) रोजी फ्लाइट निश्चित केली होती.

मात्र, आयपीएल फायनलमध्ये असे दोन संघ पोहोचले आहेत. ज्या संघातील एकाही भारतीय खेळाडूच नाव टी20 विश्वचषकात नाही. बीसीसीआयनं भारताच्या 15 सदस्यीय संघाऐवजी 4 राखीव खेळाडूंची देखील निवड केली आहे. त्यामध्ये शुबमन गिल, रिंकू सिंह, आवेश खान, खलील अहमद यांचा समावेश आहे. रिंकू सिंह फायनलमध्ये पोहचलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाचा भाग आहे. 15 सदस्यीय भारतीय संघ जरी (25 मे) रोजी अमेरिकेला रवाना झाला. तरीही रिंकू सिंह (27 मे) रोजी किंवा त्यानंतर अमेरिकेला रवाना होऊ शकतो.

टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ (15 सदस्य): रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, शिवम दुबे, संजू सॅमसन, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग.

राखीव खेळाडू: शुबमन गिल, रिंकू सिंह, आवेश खान आणि खलील अहमद.

 

महत्वाच्या बातम्या

टी20 वर्ल्ड कपमध्ये अमेरिकेला हलक्यात घेणं परवडणारं नाही! ‘हे’ 5 खेळाडू बनू शकतात डोकेदुखी, जाणून घ्या

हार्दिक पांड्याच्या संपत्तीचा 70 टक्के हिस्सा घेणार नताशा? मुंबईच्या कर्णधाराची एकूण संपत्ती किती?

फायनलमध्ये कोलकाताशी भिडणार हैदराबाद, कोणाचं पारडं जड जाणून घ्या हेड टू हेड रेकाॅर्ड

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---