इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्याचे सामने झाल्यानंतर या वर्षाच्या शेवटी टी-२० विश्वचषक स्पर्धेचा थरार रंगणार आहे. ही स्पर्धा युएई आणि ओमानमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी सर्वच संघ जोमाने तयारी करताना दिसून येत आहेत. भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि इंग्लंड अशा बलाढ्य संघांमध्ये ट्रॉफी मिळवण्यासाठी चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. अशातच माजी भारतीय क्रिकेटपटूने कुठला संघ या स्पर्धेत जेतेपद पटकावणार? याबाबत भाष्य केले आहे.
माजी भारतीय दिग्गज क्रिकेटपटू दीप दासगुप्ता यांनी आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेत कुठला संघ बाजी मारेल? याबाबत भाष्य केले आहे. त्यांच्या मते, भारत, ऑस्ट्रेलिया किंवा पाकिस्तान नव्हे तर वेस्ट इंडिज संघ हा टी-२० विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार आहे. वेस्ट इंडिज संघातील दिग्गज खेळाडू ख्रिस गेल, लेंडल सिमन्स, आंद्रे फ्लेचर,आंद्रे रसल आणि ब्रावो हे चांगल्याच फॉर्ममध्ये आहेत, ज्याप्रकारे त्यांनी ऑस्ट्रेलिया संघाला टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या ३ सामन्यात पराभूत केले आहे. ते पाहून हा संघ आणखी मजबूत संघ वाटू लागला आहे. (Not India England, australia or pakistan this team will win icc T20 world cup 2021 says dip Dasgupta)
दीप दासगुप्ता यांनी आपल्या यूट्यूब चॅनेलवर म्हटले की, “फक्त फलंदाजीच नव्हे तर या संघातील गोलंदाज देखील चांगली कामगिरी करत आहेत. कॅरेबियन संघ आपल्या फलंदाजीवर जास्त अवलंबून असतो, हा संघ १८० किंवा २०० धावा करून आपल्या फलंदाजीच्या जोरावर सामना जिंकण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु गेल्या मालिकेत आणि आता झालेल्या मालिकेत त्यांच्या गोलंदाजांनी देखील चांगली कामगिरी केली आहे. ओबेड मेक्कॉय, हेडन वॉल्श ज्युनियर आणि शेल्डन कॉट्रेल यांनी अप्रतिम गोलंदाजी केली आहे. तसेच या संघात अष्टपैलू खेळाडू देखील आहेत, जे चांगली गोलंदाजी करतात.”
संघाचा आक्रमक अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसल हा देखील फॉर्ममध्ये आला आहे. तसेच तिसऱ्या टी-२० सामन्यात ख्रिस गेलने देखील तुफान फटकेबाजी केली होती.
तसेच ते पुढे म्हणाले की, “टी -२० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन युएईमध्ये होणार आहे. मला असे वाटते की, ही खेळपट्टी वेस्ट इंडिज संघाच्या फलंदाजांसाठी अनुकूल ठरेल. टी -२० विश्वचषक स्पर्धेपूर्वी आयपीएलचे उर्वरित सामने खेळवण्यात येणार आहेत. त्यामुळे खेळपट्टी आणखी सपाट होईल, ज्याचा फायदा वेस्ट इंडिज संघातील फलंदाजांना होऊ शकतो.”
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ ६ भारतीय धुरंधराचे श्रीलंका दौऱ्यावर उजळणार नशीब, मिळू शकते पदार्पणाची संधी
स्टार्क-रसेलमध्ये वर्चस्वाची लढाई, ६ चेंडूत ११ धावांची गरज असताना ऑसी दिग्गजाने ‘अशी’ मारली बाजी
तब्बल १९ हजारपेक्षा जास्त धावा चोपणाऱ्या दिग्गजावर मोठी जबाबदारी, ‘या’ संघाचा बनला हेड कोच