दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान यांच्यात जोहान्सबर्ग येथे रविवारी (०४ एप्रिल) दुसरा वनडे सामना पार पडला. या सामन्यातील अंतिम षटकात दक्षिण आफ्रिकाचा यष्टीरक्षक क्विंटन डीकॉकने केलेल्या कृत्यावरुन सोशल मीडियावर चांगलाच वाद पेटला आहे. डीकॉकच्या चपळाईमुळे पाकिस्तानी फलंदाज फखर जमान याचे द्विशतक थोडक्यात हुकले. या कृत्याने क्रिकेटप्रेमींना एका जुन्या किस्स्याची आठवण झाली आहे.
झाले असे की लुंगी एन्गिडीने टाकलेल्या चेंडूवर फखरने फटका मारला. त्यानंतर तो आणि त्याच्याबरोबर फलंदाजीला असलेल्या हॅरीस रॉफने धावा मिळवण्यासाठी धाव घेतली. त्यांनी पहिली धाव यशस्वी पार केली. मात्र दुसरी धाव घेत असताना दक्षिण आफ्रिकेचा क्षेत्ररक्षक एडेन मार्करमने यष्टीरक्षक उभ्या असलेल्या एन्डकडे चेंडू फेकला आणि तो चेंडू थेट स्टंपला लागला. त्यावेळी फखर क्रिजमध्ये परतलेला नव्हता, त्यामुळे त्याला बाद होऊन परतावे लागले.
यावेळी दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक क्विंटॉन डीकॉकची चालाखी कामी आली. कारण त्याने अशी कृती केली की फलंदाजाला असे वाटेल की क्षेत्ररक्षक गोलंदाजाच्या एन्डला चेंडू फेकणार आहे. ज्यामुळे फखरने मागे वळून पाहिले आणि त्याला क्रिजमध्ये येण्यास काही सेंकद उशीर झाला आणि तो धावबाद झाला. तसेच अवघ्या ७ धावांनी द्विशतकाची संधीही हुकली.
https://twitter.com/MMumtaz36130331/status/1378915482615619586?s=20
अगदी हुबेहुब किस्सा यापुर्वीही घडला होता. गमतीची बाब अशी की, त्यावेळीही पाकिस्तान संघाचाच फलंदाज विरोधी संघातील यष्टीरक्षकाच्या योजनेच्या जाळ्यात सापडला होता.
संयुक्त अबर अमिरातीत श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात पाकिस्तानचा फलंदाज अहमद शहजाद फलंदाजी करत होता. तो मोठा शॉट मारल्यानंतर २ धावा घेण्याच्या प्रयत्नाने धावत होता. पहिली धाव पूर्ण केल्यानंतर तो दुसऱ्या धावेसाठी पळाला. यावेळी यष्टीरक्षक कुमार संगकाराने चेंडू आपल्या हाती आला आहे आणि आपण तो यष्टीवर लावला आहे, असा अभिनय केला. फलंदाज शहजादने स्वत:ला बाद होण्यापासून वाचवण्यासाठी जोराने डाइव्ह मारली.
Quinton de Kock did not pull off the coolest moment by a wicket-keeper on a cricket field.
That distinction still belongs to Kumar Sangakkara
GOAT cool act.pic.twitter.com/zrI39xS9XP
— Rohit Sankar (@imRohit_SN) April 4, 2021
त्यानंतर क्षेत्ररक्षकाने वास्तवात चेंडू संगकाराकडे फेकला आणि तो चेंडू पकडून बाजूला झाला. हा प्रसंग पाहून समालोचकांनाही हसू आवरले नव्हते.
महत्त्वाच्या बातम्या-
अरर! क्विंटॉन डीकॉकच्या चालाखीमुळे फखर जमानचे दुसरे वनडे द्विशतक थोडक्यात हुकले, पाहा व्हिडिओ
द्विशतक पूर्ण नाही झाले, पण फखर जमानने सचिन तेंडुलकरला मागे टाकत केला ‘हा’ विश्वविक्रम
‘या’ कारणामुळे वॉशिंग्टन सुंदरने आपल्या पाळीव कुत्र्याचे नाव ठेवले ‘गॅबा’