मुंबई | रविवारी आयपीएलमधील मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली डेअरडेविल्स यांच्यात झालेल्या सामन्यात मुंबईला ११ धावांनी निराशाजनक पराभवाला सामोरे जावे लागले.
यामुळे मुंबईचे प्ले-आॅफचे दरवाजे बंद झाले. तीन वेळच्या विजेत्यांना ११ आयपीएलमध्ये चौथ्यांदा प्ले-आॅफमध्ये प्रवेश करण्यात अपयश आले.
काल ज्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली मुंबईचा संघ पराभूत झाला तो रोहित शर्मा हा मुंबईकर आहे तर ज्या संघाने मुंबईला पराभूत केले त्या दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर हा देखील मुंबईकर असुन मुंबई रणजी संघाचा अविभाज्य भाग आहे.
काल मुंबई या सामन्यात पराभूत झाल्यामुळे मुंबईकर अजिंक्य रहाने ज्या संघाच नेतृत्व करत आहे ती राजस्थान राॅयल्स मात्र प्ले-आॅफला पात्र ठरली.
विशेष म्हणजे श्रेयस अय्यर, रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे हे भारतीय संघातून खेळत असुन मुंबई रणजी संघाचे ते भाग आहेत.
यावर्षी गौतम गंभीरने आयपीएलच्या अर्ध्यातूनच दिल्लीच्या कर्णधार पदाचा राजीनामा दिल्यामुळे २३वर्षीय श्रेयस अय्यरकडे दिल्लीचे कर्णधारपद आले होते तर चेंडू छेडछाड प्रकरणी स्टीव स्मिथला राजस्थानचे कर्णधापद गमवावे लागले. त्यामुळे संपुर्ण मोसमात आयपीएलचे कर्णधारपद मुंबईकर अजिंक्य रहाणेला मिळाले. रोहित गेले अनेक हंगाम मुंबईचे कर्णधारपद सांभाळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–सिंधुला बॅडमिंटनमध्ये दुहेरीत जोडीदार म्हणुन हवा धोनी !
–२० वर्षाच्या रिषभ पंतने आज जे केले ते अनेकांना ११ आयपीएलमध्ये करता आले नाही
–साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यासाठी मुंबईकडून एक मोठा बदल
–टी२०मध्ये ५२८ चौकार आणि तेवढ्याच षटकारांची बरसात करणारा तो पहिलाच खेळाडू
–धोनीकडून मिळली किदांबी श्रीकांतला खास भेट!
–राफेल नदालबद्दल या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?