जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेला सर्बियाचा टेनिसपटू नोवाक जोकोविचने ३१ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या पॅरिस मास्टर्समध्ये भाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे. जोकोविच हंगामाच्या शेवटी आपला अव्वल क्रमांक कायम राखणार आहे.
३३ वर्षीय जोकोविचने बेलग्रेड डेली स्पोर्ट्सकी जर्नलच्या बुधवारच्या एडिशनमध्ये बोलताना म्हटले, “मी पॅरिसमध्ये खेळणार नाही. कारण मला माझ्या पॉईंट्स टॅलीमध्ये काहीही जोडायचे नाही. परंतु मी विएना आणि लंडनला जाईल.”
पुढे बोलताना तो म्हणाला, “मी विएनामध्ये ५०० गुणांपर्यंत जिंकू शकतो. कारण मागील वर्षी तिथे खेळलो नव्हतो. आणि लंडनमध्येही खूप गुण उपलब्ध आहेत.” जोकोविचने मागील महिन्यात रोममध्ये इटालियन ओपनचे विजेतेपद जिंकून ३६वा एटीपी मास्टर्सचे विजेतेपद जिंकले होते. त्याने दिग्गज टेनिसपटू राफेल नदालला मागे टाकले होते.
नदाल होणार पॅरिस मास्टर्समध्ये सहभागी
१३ व्या फ्रेंच ओपनचे विजेतेपद जिंकणाऱ्या नदालने पुष्टी केली की तो पॅरिस मास्टर्समध्ये भाग घेणार आहे. नदालने रॉजर फेडररच्या २० ग्रँड स्लॅमच्या विजेतेपदांची बरोबरी केली आहे. तसेच नदाल त्याच्या पुढील योजनांबद्दल म्हणाला की, तो २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरपर्यंत विएनामध्ये होणाऱ्या स्पर्धेत भाग घेणार नाही. परंतु १५ ते २२ नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या लंडनमध्ये एटीपी फायनल्समध्ये तो भाग घेण्याची आशा आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या पॅरिस मास्टर स्पर्धेत राफेल नदाल होणार सहभागी
-St. Petersbug Open : रियल ओपाल्कने गतविजेत्या मेदवेदेवला दिला पराभवाचा धक्का
-Australia Open : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला क्वारंटाईन नियमांमध्ये हवी सूट