पॅरिस | एटीपी क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या नोव्हाक जोकोविचने 17 व्या क्रमांकावर असलेल्या पाब्लो कॅरेनो बुस्टाला पराभूत केले आणि 10 व्या वेळी फ्रेंच ओपनच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. जोकोविचच्या डाव्या हाताला वेदना होत होत्या. या वेदनांशी झुंज देत त्याने हा सामना जिंकला. आता त्याला अंतिम चारमध्ये ग्रीसच्या स्टीफानोस सीतसिफासचा सामना करावा लागेल.
या सामन्यात जोकोविचने संथ गतीने सुरुवात केली. यादरम्यान त्याला वेदनांमुळे बराच त्रास सहन करावा लागला. ट्रेनरने त्याच्या हाताला मालीश करून दिली. तथापि, तीन तास 10 मिनिटे चाललेला हा सामना जोकोविचने 4-6, 6-2, 6-3, 6–4 ने जिंकला.
गेल्या महिन्यात यूएस ओपनच्या चौथ्या फेरीतही दोन्ही खेळाडू आमनेसामने आले होते, तेव्हा लाईन अंपायरला रागाच्या भरात चेंडू मारल्याने जोकोविचला स्पर्धेतून बाहेर जावे लागले. 2020 मधील हा एकमेव सामना होता ज्यामध्ये जोकोविचला विजय मिळवता आला नव्हता. त्यानंतर जोकोविचने सर्व 10 सामने जिंकले आहेत. यावर्षी त्याने खेळलेल्या 37 सामन्यांपैकी 36 सामने जिंकले आहेत.
सामना संपल्यानंतर जोकोविच म्हणाला, “मला आज कोर्टवर येऊन आनंद झाला. मला सामन्यादरम्यान दुखापतीचा सामना करावा लागला. काही वेळानंतर मला बरे वाटले आणि जास्त वेदना होत नव्हत्या. मला चांगली कामगिरी करायची होती. तो दीड सेटमध्ये माझ्यापेक्षा चांगला खेळला. सामन्याच्या शेवटी पायामध्ये काहीच शक्ती शिल्लक नव्हती.
त्याचबरोबर दुसर्या उपांत्यपूर्व सामन्यात सीतसिपासने आंद्रे रुबलेव्हचा 7-5, 6-2, 6-3 ने पराभव केला. दुसर्या उपांत्य सामन्यात विद्यमान विजेता स्पेनच्या राफेल नदालचा सामना डिएगो श्वार्टझमनशी होईल.
पुरुष एकेरी उपांत्य फेरीतील सामने :
राफेल नदाल वि. डायगो श्वार्टझमन
नोव्हाक जोकोविच वि. स्टीफानोस सीतसिफास
पॅरिस मास्टर्स वेळापत्रकानुसारच होईल
फ्रेंच टेनिस महासंघाने (एफएफटी) सांगितले केली की पॅरिस मास्टर्स 2020 नियोजित वेळेनुसारच आयोजित केले जाईल. 31 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबरदरम्यान एकोर एरेना येथे ही स्पर्धा होणार आहे. कोव्हिड-19 या साथीच्या आजाराच्या प्रदूरर्भावामुळे खबरदारी म्हणून दररोज 1000 प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश मिळू शकेल.
जगातील पहिल्या क्रमांकाचा टेनिसपटू नोव्हाक जोकोविच पॅरिस मास्टर्सचा चॅम्पियन आहे. गेल्या वर्षी त्याने अंतिम सामन्यात कॅनडाच्या डेनिस शापोवालोव्हचा पराभव केला होता. पॅरिसमध्ये फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धा सुरू आहे, ज्यामध्ये दररोज 5000 प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला जात आहे. यावर्षी मे महिन्यात फ्रेंच ओपनचे आयोजन होणार होते. परंतु कोरोना विषाणूमुळे ती 2 सप्टेंबरपासून सुरू झाली आणि 11 नोव्हेंबर रोजी संपेल.