टोकियो ऑलिम्पिकसाठी आता आठवड्याभराचाच कालावधी राहिला आहे. मात्र, या स्पर्धेतून अनेक दिग्गज टेनिसपटूंनी माघार घेतली आहे. त्यामुळे, जागतिक क्रमवारीत पहिला क्रमांकाचा टेनिसपटू नोवाक जोकोविच देखील माघार घेणार का? असा प्रश्न अनेक टेनिसप्रेमींना पडला होता. मात्र, आता स्वत: जोकोविचनेच या प्रश्नांवर पडदा टाकत तो टोकियो ऑलिम्पिकमध्ये सार्बियाचे प्रतिनिधित्व करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
जोकोविचने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यातून त्याने स्पष्ट केले की तो टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळताना दिसेल. तसेच त्याने ट्विट करत देखील तो सार्बियाकडून खेळण्याचा आणि पदक मिळवण्याचा प्रयत्न करेल, असे सांगितले आहे.
त्याने जो व्हिडिओ शेअर केला आहे, त्यात तो कोजिरो ओवाकी नावाच्या सहा वर्षांच्या मुलाशी संवाद साधताना दिसत आहे. जोकोविचने या चिमुकल्याशी त्याच्या ६ व्या वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा देण्यासाठी संवाद साधला होता. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये जोकोविचने लिहिले आहे की ‘मी माझा लहान मित्र कोजिरोला निराश करू शकत नाही. मी टोकियोसाठी माझे तिकीट बुक केले आणि ऑलिम्पिकसाठी अभिमानाने टीम सर्बियात सामील सामील होणार आहे.’
Cannot disappoint my little friend Koujirou. I booked my flight for Tokyo and will proudly be joining #TeamSerbia for the Olympics. 🇷🇸 pic.twitter.com/23TmSdvc4x
— Novak Djokovic (@DjokerNole) July 15, 2021
तसेच पुढे आणखी एक ट्विट केले आहे की ‘मला टोकियोला जाण्याचा आणि ऑलिम्पिकमध्ये पदकाच्या लढतीसाठी माझ्या राष्ट्रीय संघात सामील होण्याचा मला खूप अभिमान आहे. माझ्यासाठी सर्बियाकडून खेळणे नेहमीच एक विशेष आनंददायी आणि प्रेरणादायी राहिले आहे आणि सर्वांना आनंदी करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करीन.’
С великим поносом се пакујем за Токио и придружујем нашој репрезентацији у борби за најсјајнија одличја на Олимпијским борилиштима. За мене је игра за Србију увек била посебна радост и мотивација и даћу све од себе да нас све обрадујем! Идемооо 💪🏼
— Novak Djokovic (@DjokerNole) July 15, 2021
जोकोविचला गोल्डन स्लॅम पूर्ण करण्याची संधी
जोकोविचने यावर्षी ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन या ग्रँडस्लॅम स्पर्धांचे विजेतेपद आधीच जिंकले आहे. त्यामुळे त्याच्याकडे यंदा गोल्डन स्लॅम पूर्ण करण्याची संधी आहे. म्हणजेच जर त्याने अगामी टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले आणि पुढे अमेरिकन ओपन ही ग्रँडस्लॅम स्पर्धाही जिंकली, तर तो कारकिर्दीत गोल्डन स्लॅम पूर्ण करेल. यापूर्वी अशी कामगिरी ओपन एरामध्ये कोणत्याही पुरुष टेनिसपटूला करता आलेली नाही.
जोकोविचने आत्तापर्यंत कारकिर्दीत २० ग्रँडस्लॅम विजेतीपदं मिळवली आहेत. त्यामुळे तो रॉजर फेडरर आणि राफेल नदालसह सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या पुरुष टेनिसपटूंच्या यादीत संयुक्तरित्या अव्वल क्रमांकावर आहे. फेडरर आणि नदाल यांनीही २० वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत.
टोकियो ऑलिम्पिकमधून या दिग्गज टेनिसपटूंची माघार
टोकियो ऑलिम्पिकमधून अनेक दिग्गज टेनिसपटूंनी माघार घेतली आहे. टोकियो ऑलिम्पिकमधून माघार घेणाऱ्या स्टार टेनिसपटूंच्या यादीत रॉडर फेडरर, राफेल नदाल, डॉमनिक थीम, सेरेना विलिम्स, सिमोना हालेप, निक किरगियॉस, स्टॅन वावरिंका अशा अनेकांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
भारताचा युवा टेनिसपटू सुमित नागलला लागली ऑलिम्पिकची लॉटरी, पुरुष एकेरीत करणार प्रतिनिधित्व
मोठी बातमी! टेनिस स्टार रॉजर फेडररची टोकियो ऑलिम्पिकमधून माघार, ‘हे’ आहे कारण
कधीकाळी चौकार-षटकार ठोकणारी बार्टी बनली विम्बल्डन विजेती; आयसीसीने खास व्हिडिओसह केले अभिनंदन