एटीपी गेल्या आठवड्यात घोषित केलेल्या टेनिस खेळाडूंच्या कारकिर्दीतील कमाईच्या यादीत रॉजर फेडररला मागे टाकून नोवाक जोकोविचने प्रथम क्रमांक मिळवला आहे. नोवाक जोकोविचने आजपर्यत कारकिर्दीत $109,805,403 एवढे रुपये फक्त खेळाच्या माध्यमातून कमावले आहेत.
या यादीत १९ ग्रँडस्लॅम विजेता रॉजर फेडरर हा दुसऱ्या स्थानावर असून त्याची कारकिर्दीतील एकूण कामे $107,309,145 एवढी आहे. अपेक्षेप्रमाणे फॅब ४ मधील राफेल नदाल ($86,111,497) आणि अँडी मरे ($60,807,644) तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहे.
या अधिकृत यादीप्रमाणे जोकोविचची कारकिर्दीतील कमाई ही एकेरीमधून $2,083,741 तर दुहेरीमधून $32,783 एवढी आली आहे. तर फेडररची दुहेरीमधून आलेली कमाई शून्य डॉलर दाखवण्यात आली आहे.
विशेष म्हणजे भारताचा लिएंडर पेस हा एकमेव खेळाडू पहिल्या १०० खेळाडूंमध्ये असून तो ७६ व्या स्थानावर आहे. त्याची कमाई ही पूर्णपणे दुहेरीमधून आलेली दाखवण्यात आली असून त्याची कारकिर्दीतील एकूण कमाई $8,324,051 एवढी आहे.
जर प्रत्येक सामन्यानुसार जर सरासरी कमाई काढली तर त्यातही जोकोविच पहिला आहे. त्याची प्रत्येक सामन्याला सरासरी कमाई 115,752 डॉलर आहे.
कारकिर्दीतील एकूण कमाई
नोवाक जोकोविच $109,805,403
रॉजर फेडरर $107,309,145
राफेल नदाल $86,111,497
अँडी मरे $60,807,644
प्रत्येक सामन्याला सरासरी कमाई
जोकोविच : 115,752
नदाल : 82,429
फेडरर: 78,454
मरे: 71,942
वावरिंका:41,531
राओनिक:37,429
निशिकोरी:36,110