मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा जगातील आत्तापर्यंतच्या महान क्रिकेटपटूंपैकी एक आहे. आज क्रिकेटमध्ये नाव कमावलेले अनेक क्रिकेटपटूंसाठी आणि क्रिकेटपटू बनू इच्छिणाऱ्या अनेकांसाठी तो प्रेरणा आहे. त्याने त्याच्या 24 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक मोठे विक्रम नोंदवले. जे आजही एखाद्या क्रिकेटपटूसाठी तोडणे फार कठीण आहेत. असाच एक विक्रम सचिनने 11 वर्षांपूर्वी केला होता. जो आजही त्याच्याच नावावर आहे.
20 नोव्हेंबर 2009 रोजी अहमदाबाद येथे श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात सचिनने एक मोठी कामगिरी केली होती. त्या कसोटीच सचिनने दुसऱ्या डावात शतरी खेळी केली होती. हे त्याचे कसोटी कारकिर्दीतील 43 वे शतक होते. याबरोबरच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 30,000 धावांचा टप्पाही पार केला होता. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 30,000 धावा करणारा तो पहिला आणि एकमेव क्रिकेटपटू ठरला होता. कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी सचिनने ही कामगिरी केली होती.
आजही सचिन व्यतिरिक्त कोणत्याच क्रिकेटपटूला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 30,000 धावांचा टप्पा ओलांडता आलेला नाही.
वेलेगेदेराच्या चेंडूवर एकेरी धाव काढत पार केला 30,000 धावांचा टप्पा
अहमदाबाद कसोटी सामन्यात भारताच्या दुसर्या डावाच्या वेळी सचिनने चनाका वेलेगेदेराला डीप स्क्वेअर लेगमध्ये एक धाव काढली आणि त्याने 35 व्या धावेसमवेत या विक्रमाला गवसणी घातली.
त्यावेळी ‘मास्टर ब्लास्टर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या फलंदाजाने 436 वनडे सामन्यात 55.5 च्या सरासरीने 17178 धावा केल्या होत्या तर कसोटी सामन्यांमध्ये त्याची धावांची संख्या 12812 पर्यंत पोहोचली होती. याशिवाय दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या एकमेव टी -20 सामन्यात 10 धावांची खेळी खेळत क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात (17178, 12812, आणि 10) त्याच्या एकूण धावांची संख्या 30 हजार झाली होती.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत सचिन पाठोपाठ संगकारा दुसरा
कोणत्याही फलंदाजासाठी सचिनच्या विक्रमाची बराबरी करणे सोपे नाही. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावांच्या यादीत मास्टर ब्लास्टर सचिननंतर कुमार संगकाराचा क्रमांक लागतो, ज्याने एकूण 28016 धावा केल्या आहेत. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग 27483 धावाांसह तिसर्या क्रमांकावर आहे.
संपूर्ण क्रिकेट कारकिर्दीत 47 वर्षीय सचिनने 200 कसोटी सामन्यांमध्ये 15921, 463 वनडे सामन्यात 18426 आणि एकमेव टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 10 धावा केल्या. त्याने कसोटीत 46 बळी तर वनडे सामन्यात 154 बळी घेतले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
मेलबर्न कसोटीपूर्वी आयोजक चिंतेत; खेळपट्टीचे नाही करता येणार परीक्षण
साक्षी धोनी म्हणते, “…तर मी माहीकडे पाहिलंही नसतं”
भारताला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सोपी खेळपट्टी मिळणार? पाहा पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू काय म्हणतोय