लॉस एंजेलिस येथे २०२८ साली होणार्या ऑलिंपिक खेळांमध्ये क्रिकेटचा समावेश न झाल्यास क्रिकेट ऑस्ट्रेलिया (सीए) २०३२मध्ये ब्रिस्बेन येथे होणार्या ऑलिम्पिकमध्ये या खेळाचा समावेश करण्याची योजना आखत आहे. इएसपीएनमधील एका अहवालानुसार, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या खेळाला ऑलिम्पिकचा भाग बनवण्यासह भविष्यासाठी आपल्या योजना उघड केल्या आहेत.
रिपोर्टनुसार, ‘लॉस एंजेलिसमध्ये २०२८च्या उन्हाळी खेळांमध्ये क्रिकेटचा समावेश न केल्यास, १९०० नंतर प्रथमच २०३२ साली क्रिकेटचे ऑलिम्पिकमध्ये पुनरागमन करणे हे दुसरे लक्ष्य आहे. यादी तयार करण्यात आली आहे, त्यात क्रिकेटचाही समावेश आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) या महिन्याच्या अखेरीस आयोजकांसमोर सादरीकरण करेल असे भाकित देखील वर्तवले जात आहे.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा