---Advertisement---

“आता भारत-पाकिस्तानमध्ये कसोटी मालिका खेळवा”, दिग्गजाने व्यक्त केले मत, ठिकाणही सुचविले

On: मंगळवार, फेब्रुवारी 10, 2026 1:59 PM
Ind vs Pak
---Advertisement---

भारत आणि श्रीलंकेत सुरू असलेल्या आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना खेळला जाणार हे निश्चित झाले आहे. १५ फेब्रुवारीला कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. आयसीसीच्या अथक प्रयत्नानंतर पाकिस्तान सरकार आणि क्रिकेट बोर्डने या सामन्याला मंजुरी दिली. आता या दोन्ही संघामध्ये कसोटी मालिका खेळवा, असे मत माजी क्रिकेटपटूने व्यक्त केले आहे.

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन यांनी टी२० विश्वचषक २०२६मध्ये खेळला जाणारा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होत आहे, हे चांगले आहे. त्यातच त्यांनी या दोन संघांमध्ये कसोटी मालिका व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे. ही मालिका कुठे खेळवावी असे न्यूट्रल व्हेन्यूही त्यांनी सांगितले आहे.

वॉन यांनी त्यांच्या एक्सच्या अकाऊंटवर लिहिले, ‘ भारत विरुद्ध पाकिस्तान सामना खेळला जाणार असून हे स्पर्धेसाठी आणि क्रिकेटसाठी चांगले आहे. आता लवकरच त्यांच्यात कसोटी मालिका व्हावी. युके त्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी उत्तम ठिकाण आहे.’

भारत विरुद्ध पाकिस्तान सामने मागील काही वर्षांपासून चाहत्यांना केवळ आयसीसी स्पर्धांमध्ये पाहायला मिळत आहेत. या दोन्ही देशांमध्ये २०१२नंतर कोणतीच द्विपक्षिय मालिका खेळली गेली नाही. राजकिय तणावामुळे हे दोन्ही संघ बहुदेश असलेल्या स्पर्धांमध्ये खेळत आहेत. आता त्यातही अडचणी येताना दिसत आहेत.

आशिया चषक २०२५च्या अंतिम फेरीत भारत-पाकिस्तान समोरा-समोर आले होते. त्यामध्ये भारत जिंकला होता, मात्र भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास मनाई केली होती. तसेच अनेक सामन्यांमध्ये दोन्ही संघांच्या खेळाडूंनी हस्तांदोलन करण्यासही मनाई केली. त्याच्या प्रत्यत १९ वर्षाखालील मुलांच्या आयसीसी विश्वचषकातही आला.

पाकिस्तानने टी२० विश्वचषकात भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकला होता. याचा संबंध बांग्लादेश क्रिकेटशी आहे. बांग्लादेशचा मुस्तफिजुर रहमानला बीसीसीआयने आयपीएल २०२६साठी कोलकाता नाईट रायडर्सला त्याला करारातून मुक्त करण्यास सांगितले होते. त्यानंतर बांग्लादेशने भारतात टी२० विश्वचषक खेळण्यास मनाई केली होती.

या स्पर्धेचे बांग्लादेशचे सर्व गटाचे सामने भारतात खेळवले जाणार होते, मात्र राजकीय तणावामुळे त्यांच्या खेळाडूंना भारत असुरक्षित वाटला आणि त्यांनी स्पर्धेतून माघार घेण्याचे ठरवले. त्यांना समर्थन म्हणून पाकिस्तानने भारताविरुद्ध खेळण्यास तात्पुरता नकार दिला होता. आता सर्वकाही ठिक असले तरी, वॉन यांची मागणी मात्र पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---