भारतीय क्रिकेटपटू एमएस धोनीकडे व्यावसायिक नेमबाज वापरतात ती वाल्थर रायफल आहे. तसेच, तो भारतीय राष्ट्रीय रायफल महासंघाचा (एनआरएआय) आजीवन सदस्य आहे. अशातच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनीकडे नेमबाजीत कारकिर्द घडवण्याचा पर्याय उपलब्ध आहे.
धोनीकडे असणारी वाल्टर रायफल एलजी ३०० एक्सटी वाल्टर कार्बोनटेक मॉडल ही बीजिंग ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय नेमबाज अभिनव बिंद्राकडेही आहे. धोनीने ही रायफल विकत घेण्यासाठी रात्री २ वाजता शिमोन शरीफला मेल पाठवला होता आणि रांचीतील आपल्या घरी ही रायफल पोहोचल्यानंतर त्याने नेमबाजीवर आपला हात आजमावला होता. त्यानंतर त्याने या रायफलचा वापर देशातील अनेक शूटिंग रेंजमध्ये केला. NRAI LIfe Member And Walther Rifle Owner Says That Ms Dhoni Has Another Option In Shooting
इंडियन शूटिंग डॉट कॉम वेबसाइट चालवणाऱ्या भारताचा माजी नेमबाज शिमोन शरीफने पीटीआयशी बोलताना म्हटले की, “मला एकदा रात्री २ वाजता रायफल आयात करण्यासाठी मेल आला. त्यासाठी मी पूर्ण नाव आणि पत्ता विचारला. त्यानंतर काही वेळातच नावाबरोबर रांचीचा पत्ता मी पाहिला. त्यावेळी जाणवले की, हा तर स्वत: धोनी आहे.”
शरीफ हा भारतातील प्रमुख नेमबाजांसाठी लागणाऱ्या साधनांचे आयात करणाऱ्या व्यक्तींमधील मुख्य व्यक्ती आहे. “जेव्हा धोनीने वाल्टर रायफल मागवली होती. तेव्हा तो खेळण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी याचा वापर करण्यासाठी रायफल घेत असेल असे मला वाटले होते. कारण एक महान क्रिकेटपटू क्रिकेटपासून वेळ काढू शकत नाही. मी खूप व्यावसायिक ऍथलिट्सला पाहिले आहे, ज्यांनी निवृत्तीनंतर नेमबाजीमध्ये आपला हात आजमावला आहे आणि ते चॅम्पियन बनले आहेत. कारण, इतर खेळांच्या उलट नेमबाजी आणि गोल्फ या खेळांमध्ये खेळाडूंच्या वयाची मर्यादा नसते,” असे पुढे बोलताना शरीफ म्हणाला
धोनीपाठोपाठ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणाऱ्या सुरेश रैनाला काही दिवसांपुर्वी नेमबाज मानवादित्य सिंग राठोड यांनी सांगितले होते की, धोनी नेमबाजीमध्ये व्यावसायिक नेमबाजांप्रमाणे आहे.
ऑलिंपिकमध्ये नेमबाजीत रौप्य पदक मिळवणाऱ्या राज्यवर्धन सिंग राठोड यांचा मुलगा मानवादित्य म्हणाला की, “जेव्हा धोनी त्यांच्या घरी गेला होता, तेव्हापासून ते धोनीच्या नेमबाजीने प्रभावित आहेत. मला वाटते की, तो नेहमी योग्य निशाना साधतो. २०१७ला जेव्हा कोलकातामध्ये पावसामुळे एका संघाचे सराव सत्र रद्द झाले होते. तेव्हा धोनी कोलकाता पोलिस प्रशिक्षण विद्यालयात गेला होता आणि पिस्तूल शूटिंगमध्ये त्याने हात आजमावला होता.”.
महत्त्वाच्या बातम्या –
ज्या खात्यात धोनीने टीसी म्हणून काम केले, त्याच खात्याने धोनीचा केला अनोखा सन्मान
सध्याच्या भारतीय संघातील सर्वात अनुभवी कसोटीपटूची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस
पाकिस्तानचा माजी कर्णधार म्हणतोय, मी सचिन तेंडूलकरला सांगितले होते की धोनी…
ट्रेंडिंग लेख –
सीपीएल २०२०: जमैका तल्लावझ विरुद्ध सेंट ल्युसिया झुक्स सामन्यांत ‘या’ ३ खेळाडुंवर असेल नजर
आयपीएल २०२०: या ३ खेळाडूंची मुंबई इंडियन्सला भासू शकते उणीव
‘कॅप्टनकूल’ एमएस धोनीचे ५ असे निर्णय, ज्याचा झाला टीम इंडियाला मोठा फायदा