भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याने आपल्या विस्फोटक फलंदाजीने जगभरातील दिग्गज क्रिकेटपटूंच्या यादीत स्थान निर्माण केले आहे. तसेच, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम हादेखील शानदार क्रिकेटपटू आहे. विराट कोहली आणि बाबर आझम हे दोघेही सध्याच्या काळातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणले जातात. जगभरातील दिग्गज क्रिकेटपटू त्यांच्या कव्हर ड्राईव्हची प्रशंसा करतात. अशात दोघांपैकी कव्हर ड्राईव्हपैकी एक निवडा असा प्रश्न न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन याला करण्यात आला. आता केन विलियम्सनचे विराट कोहलीबद्दल वक्तव्य चर्चेत आहे.
एका शोमध्ये केन विलियम्सन (Kane Williamson) याने काही मजेशीर प्रश्नांची उत्तरे दिली. यामध्ये विराट कोहली (Virat Kohli) आणि बाबर आझम (Babar Azam) यांच्या प्रश्नाचाही समावेश होता. याव्यतिरिक्त त्याने असेही सांगितले की, उमरान मलिक आणि हॅरिस रौफ यांच्यामध्ये सर्वात वेगवान गोलंदाजी कोण करते. तसेच, त्याला सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा यांच्यापैकी एकाची निवड करण्यासही सांगितले.
क्रिकेटशी संबंधित ‘You have to answer’ या शोमध्ये जेव्हा केन विलियम्सन याला विचारण्यात आले की, विराट कोहलीचा कव्हर ड्राईव्ह की बाबर आझमचा कव्हर ड्राईव्ह? यावर तो म्हणाला की, “कोहलीचा कव्हर ड्राईव्ह.” यानंतर त्याला लगेच पुढचा प्रश्न विचारण्यात आला की, सचिन तेंडुलकर की ब्रायन लारा? या प्रश्नावर त्याने सचिन तेंडुलकर याची निवड केली. या व्हिडिओच्या सुरुवातीला त्याला प्रश्न विचारण्यात आला होता की, “स्वत:चा फोन सोडणे की, झेल सोडणे?” या प्रश्नाचे उत्तर देताना त्याने फोन सोडणे योग्य सांगितले. कारण, झेल सोडल्याने निकालावर परिणाम होऊ शकतो.
यादरम्यान त्याला विचारण्यात आले की, हार्दिक पंड्या याचा हेलिकॉप्टर शॉट की सूर्यकुमार यादव याचा स्कूप शॉट? या प्रश्नाचे उत्तर देताना त्याने सूर्यकुमार यादवच्या स्कूप शॉटची निवड केली. आऊटफील्डमध्ये ग्लेन फिलिप्स आणि एबी डिविलियर्स यांच्यापैकी केन विलियम्सनला कोण हवंय? असा प्रश्न विचारला, तर त्याने डिविलियर्सला निवडले. यानंतरचा आणखी एक मजेशीर प्रश्न होता, तो असा की, विराट कोहलीची दाढी की, स्वत:ची दाढी? यावर त्याने स्वत:ची दाढी निवडली. (nz captain kane williamson picks virat kohli cover drive is better than babar azam cover drive)
भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरा सामना
भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघातील तिसरा टी20 सामना मंगळवारी (दि. 22 नोव्हेंबर) मॅकलीन पार्क, नेपियर येथे होणार आहे. 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘तो सर्वत्र आहे’, धोनीबद्दल विराट कोहलीने केलेल्या पोस्टने इंटरनेटवर एकच खळबळ; एकदा पाहाच
रोहित शर्माच्या 264 धावांही कमी पडल्या, जेव्हा नारायण जगदीसनने केली ‘एवढ्या’ धावांची विक्रमी खेळी