भारत आणि इंग्लंड याच्याबरोबरच ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. तसेच पहिल्या दिवसावर ऑस्ट्रेलियाने मजबूत पकड देखील मिळवली आहे. कारण न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत चार बाद ८९ धावा अशी अवस्था झाली असताना ग्रीन याने १६ चौकारांच्या साहाय्याने शतकी खेळी साजरी केली. ऑस्ट्रेलियाला पहिल्या दिवसअखेरीस नऊ बाद २७९ धावांपर्यंत मजल मारता आली आहे.
याबरोबरच न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिकेत चुरशीची स्पर्धा पहायला मिळत आहे. तसेच या सामन्यात सर्वांच्या नजरा दिग्गज खेळाडू केन विल्यमसनवर खिळल्या होत्या. मात्र चुकीचा फटका खेळल्यानंतर फलंदाज बाद होतो. पण धावबाद झाल्यानंतर फलंदाज खूपच निराश झालेला पहायला मिळाला होता. तसेच दुर्दैवाने तो खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला आहे.
पण 2012 नंतर विल्यमसनची कसोटी क्रिकेटमध्ये धावबाद होण्याची ही पहिलीच वेळ आहे. तसेच विल्यमसनने त्याच्या 14 वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत तिसऱ्यांदा धावबाद होऊन विकेट गमावली आहे. पण विल्यमसन कसोटी कारकिर्दीत पहिल्यांदाच शून्यावर धावबाद झाला आहे. त्यानंतर त्या व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
तसेच सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत मिचेल स्टार्कच्या चेंडूवर केन विल्यमसन मिडऑफमधून धावा चोरण्यासाठी धावत होता. पण दुसऱ्या बाजुला उभ्या असलेल्या विल यंगसोबत समन्वयाचा अभाव होता आणि लॅबुशेनने थेट मारलेल्या फटक्यामुळे विल्यमसनची विकेट पडली आहे. तर या संपूर्ण प्रकरणात मिचेल स्टार्कही या दोघांमध्ये अडकलेला दिसत आहे. मात्र यात त्याची काहीही चूक नसल्याचे समोर आले आहे.
The pressure is on New Zealand after Kane Williamson was run out – the first time in a Test Match since 2012
@BLACKCAPS v Australia: 1st Test | LIVE on DUKE and TVNZ+ pic.twitter.com/S9itasfaDg— TVNZ+ (@TVNZ) March 1, 2024
दरम्यान, केन विल्यमसन धावबाद झाल्यानंतर युवा फलंदाज रचिन रवींद्रलाही खाते उघडता आले नाही. तसेच न्यूझीलंडच्या पहिल्या 4 फलंदाजांना दुहेरी आकडाही पार करता आला नाही. मात्र, टॉप बंदर (33), ग्लेन फिलिप्स (71) आणि मॅट हेन्री (42) यांच्या खेळीमुळे संघाला 179 धावांपर्यंत मजल मारता आली आहे.
महत्वाच्या बातम्या –
- ध्रुव जुरेलची तुलाना धोनीशी केलेल्या वक्तव्यावर सौरव गांगुली म्हणाला, ‘धोनीला धोनी बनायला 15 वर्षे लागली
- IPL 2024 : शुभमन गिलने आदिवासी क्रिकेटपटूच्या वडिलांची घेतली भेट; अन् झाले भावूक, पाहा व्हिडिओ