वेलिंगटन। न्यूझीलंड विरुद्ध भारत यांच्यातील पाचवा वन-डे सामना रविवारी(3 फेब्रुवारी) वेस्टपॅक स्टेडियम, वेलिंगटन येथे खेळला जाणार आहे. या 5 सामन्यांच्या वन-डे मालिकेत भारतीय संघ 3-1 असा विजयी आघाडीवर आहे.
या सामन्यात नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा भारताचे नेतृत्व करणार आहे. रोहितने 31 जानेवारीला झालेल्या चौथ्या वनडे सामन्यात 200वा वन-डे सामने खेळण्याचा टप्पा पार केला आहे. यामुळे तो 200वन-डे खेळणारा भारताचा 14वा तर जगातील 79वा खेळाडू ठरला आहे.
रविवारी होणाऱ्या पाचव्या वनडे सामन्यात रोहितला दक्षिण आफ्रिकेचा हाशिम आमला आणि भारताचा महान खेळाडू सचिन तेंडुलकर यांचा विक्रम मोडण्याची संधी आहे.
सलामीवीर म्हणून रोहितला सर्वात जलद 6000 वन-डे धावा करण्यासाठी 161 धावांची गरज आहे. सध्या त्याने सलामीवीर म्हणून 115 डावांमध्ये 5839 धावा केल्या आहेत. या 6000 धावा सर्वात जलद करण्यासाठी त्याच्याकडे 7 डाव बाकी आहेत.
रोहितच्याआधी दक्षिण आफ्रिकेचा हाशिम आमलाने 123 डावांमध्ये आणि भारताचा महान खेळाडू सचिन तेंडुलकरने 133 डावांत सलामीला येताना 6000 धावांचा टप्पा गाठला आहे.
आतापर्यंत रोहितने 200 वनडे सामने खेळले असून त्यात 47.88च्या सरासरीने 7806 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 22 शतके आणि 39 अर्धशतके केली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
–वाढदिवस विशेष: एक हात मोडला असताना ग्रॅमी स्मिथ आला मैदानात, पुढे काय झाले पहाच!
–काय सांगता! अनुष्का शर्मा आणि साक्षी धोनी होत्या स्कूलमेट
–२०१९च्या विश्वचषकाआधी टीम इंडिया या संघाविरुद्ध खेळणार सराव सामने
–ठरले! २०२३च्या विश्वचषकाचे यजमानपद असणार या देशाकडे…