हॅमिल्टन | भारत विरुद्ध न्यूझीलंड चौथा वनडे सामना उद्या 31 जानेवारीपासून हॅमिल्टन येथे सुरु होत आहे. भारतीय संघ या मालिकेत 3-0 असा विजयी आघाडीवर आहे.
हा सामना भारत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. त्याचबरोबर हा सामना जिंकत भारताला या मैदानावरची कामगिरी सुधारण्याची संधी आहे.
हॅमिल्टनच्या सेडन पार्क या मैदानावर भारताने आतापर्यंत 9 वन-डे सामने खेळले आहेत. यातील फक्त 3 सामन्यात भारत विजयी ठरला तर उर्वरीत 6 सामने भारताने गमावले आहेत.
1981ला या मैदानावर भारताने पहिल्यांदा न्यूझीलंड विरुद्ध वन-डे सामना खेळला होता. हा सामना भारताने 57 धावांनी गमावला होता. तर 1990च्या तिरंगी मालिकेत भारताला ऑस्ट्रेलियाकडून 7 विकेट्सने पराभूत व्हावे लागले होते.
1992च्या विश्वचषकातील भारत विरुद्ध झिम्बाब्वे सामना या मैदानावर झाला होता. या सामन्यात भारताने झिम्बाब्वेला 55 धावांनी पराभूत करत या मैदानावरील पहिला विजय नोंदवला होता.
त्यानंतर न्यूझीलंडने 1995मध्ये वन-डे सामन्यांची सेंटनरी स्पर्धा आयोजित केली होती. यात भारत मोहम्मद अझरुद्दीन यांच्या नेतृत्वाखाली खेळत होता. यामध्ये भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 14 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले होते.
2003मध्ये न्यूझीलंड दौऱ्यावर असताना भारताने या मैदानावर सर्वात कमी धावसंख्या उभारण्याचा विक्रम केला होता. या सामन्यात भारताने सर्वबाद 122 धावा केल्या होत्या. हा सामना भारताने 6 विकेट्सने गमावला होता.
एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 2008-09मध्ये न्यूझीलंड दौऱ्यावर गेला होता. तेव्हा भारताने हा सामना 84 धावांनी जिंकला होता. नंतर मालिकाही 3-1ने जिंकली होती.
2014मध्ये भारत पुन्हा एकदा एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली गेला न्यूझीलंड दौऱ्यावर गेला होता. त्यात भारताने हॅमिल्टनमध्ये 2 वन-डे सामने खेळले होते. हे दोन्ही सामन्यात भारताला पराभवाला सामोरे जावे लागले होते. यातील पहिला सामना 15 धावा तर दुसरा सामना 7 विकेट्सने गमावला होता.
या मैदानावर झालेला 2015 आयसीसी विश्वचषक स्पर्धेतील सामन्यात भारताने आयर्लंडवर 8 विकेट्सने विजय मिळवला होता.
यामुळे या मैदानावर एक खास विक्रम करण्याची रोहित शर्माला संधी आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–रोहितने जर ही गोष्ट केली तर ठरणार सर्वात लकी भारतीय
–या कारणामुळे टीम इंडिया आणि पाकिस्तान विश्वचषकात वेगळ्या ग्रुपमध्ये
–२०२० टी२० विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर, पहा येथे