माऊंट मॉनगनुई| भारताचा न्यूझीलंड विरुद्ध तिसरा वन-डे सामना बे ओव्हल मैदानावर आज (28 जानेवारी) पार पडला असून भारताने हा सामना 7 विकेट्सने जिंकला आहे. तसेच 5 सामन्यांच्या वनडे मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.
या विजयामुळे विराट कोहली पहिल्या 63 वन-डे सामन्यांमध्ये नेतृत्व करताना सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या आशियाई कर्णधारांमध्ये अव्वल स्थानावर आला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने आत्तापर्यंत 47 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानचा इंझमाम उल हक असून त्याच्या नेतृत्वाखाली 40 सामन्यात पाकिस्तानने विजय मिळवला होता. तर श्रीलंकेचा सनथ जयसुर्याही 40 विजयासह दुसऱ्या स्थानावर आहे. तसेच भारताचा यष्टीरक्षक एमएस धोनी 37 विजयासह तिसऱ्या स्थानावर आहे.
विराट न्यूझीलंडमध्ये वन-डे मालिका जिंकणारा दुसराच भारतीय कर्णधार ठरला आहे. त्याचबरोबर तो ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यात द्विपक्षीय वन-डे मालिका जिंकणारा पहिलाच भारतीय कर्णधार बनला आहे.
विराटआधी धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2008-09च्या न्यूझीलंड दौऱ्यात 5 सामन्यांची वन-डे मालिका 3-1 अशी जिंकली होती.
पहिल्या 63 वन-डे सामन्यांमध्ये नेतृत्व करताना सर्वाधिक सामने जिंकणारे आशियाई कर्णधार-
47* सामने – विराट कोहली (भारत)
40 सामने – इंझमाम उल हक (पाकिस्तान)
40 सामने – सनथ जयसुर्या (श्रीलंका)
37 सामने – एमएस धोनी (भारत)
37 सामने – वसिम अक्रम (पाकिस्तान)
36 सामने – माहेला जयवर्धने (श्रीलंका)
35 सामने – मश्रफे मोर्तजा (बांगलादेश)
35 सामने – मार्वन अटापट्टूू (श्रीलंका)
34 सामने – मिसबाह उल हक (पाकिस्तान)
33 सामने – इम्रान खान (पाकिस्तान)
32 सामने – सौरव गांगुली (भारत)
32 सामने – राहुल द्रविड (भारत)
32 सामने – कपिल देव (भारत)
महत्त्वाच्या बातम्या-
–टीम इंडियाकडून अजून एकही सामना न खेळलेल्या खेळाडूचे विराट कोहलीने केले कौतुक
–टीम इंडियाकडून यशस्वी पुनरागमन केल्यानंतर हार्दिक पंड्याने मानले आभार
–९ वर्षानंतर रोहित शर्माच्या बाबतीत घडली ही नकोशी गोष्ट