हॅमिल्टन। भारताला आज (31 जानेवारी) न्यूझीलंड विरुद्ध सेडन पार्क येथे झालेल्या चौथ्या वनडे सामन्यात 8 विकेट्सने पराभव स्विकारावा लागला आहे.
या सामन्यात नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा भारताचे नेतृत्व करत होता. याबरोबरच रोहित हा त्याचा आज 200वा वन-डे सामना खेळत होता.
आजच्या सामन्यात पराभूत झाल्याने विराट आणि रोहित यांच्या बाबतीत एक विचित्र योगायोग घडून आला आहे. तो म्हणजे दोघेही त्यांच्या वैयक्तिक 200व्या वन-डे सामन्यात भारताचे न्यूझीलंड विरुद्धच नेतृत्व करत होते. तेसच दोघांच्या 200 व्या वनडे सामन्यात भारतीय संघाला न्यूझीलंड विरुद्ध पराभूत व्हावे लागले आहे.
त्याचबरोबर भारतीय कर्णधाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 12 सलग विजय मिळवण्याच्या यादीत विराट आणि रोहित दोघेही संयुक्तरित्या अव्वल क्रमांकावर आहेत.
आतापर्यंत विराटने 222 वन-डे सामन्यांच्या 214 डावांमध्ये 11376 धावा केल्या आहेत. यात त्याने 39 शतके आणि 49 अर्धशतके ठोकली आहेत. तर रोहितने 200 सामन्यांच्या 194 डावांमध्ये 7806 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 22 शतके आणि 39 अर्धशतके केली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
–अखेर विराटचा तो विक्रम मोडण्यात रोहित शर्माला आले अपयश
–२०१० नंतर भारतीय संघावर ओढावली अशी नामुष्की
–धावा केल्या सातच तरी रोहित शर्माने या दिग्गजांच्या यादीत मिळवले मानाचे स्थान