हॅमिल्टन | भारत विरुद्ध न्यूझीलंड चौथा वनडे सामना 31 जानेवारीपासून हॅमिल्टन येथे सुरु होत आहे. भारतीय संघ या मालिकेत 3-0 असा विजयी आघाडीवर आहे.
चौथा कसोटी सामना हा भारतीय संघाचा प्रभारी कर्णधार रोहित शर्मासाठी खास ठरणार आहे. कारण हा सामना त्याचा 200वा वनडे सामना ठरणार आहे. त्याचबरोबर तो 200 वन-डे सामने खेळणारा 14वा भारतीय तर जगातील 80वा खेळाडू ठरणार आहे.
रोहितच्या आधी सचिन तेंडुलकर, एमएस धोनी, राहुल द्रविड, मोहम्मद अझरूद्दीन, सौरव गांगुली, युवराज सिंग, अनिल कुंबळे, विरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग, जवागल श्रीनाथ, सुरेश रैना, कपिल देव आणि विराट कोहली या 13 भारतीय खेळाडूंनी 200वन-डे सामन्यांचा टप्पा पार केला आहे.
यापुर्वी रोहितने 199 वनडे सामने खेळले असून त्यात 48.14च्या सरासरीने 7799 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 22 शतके आणि 39 अर्धशतके केली आहेत.
रोहितने 28 जानेवारीला न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या दुसऱ्या वन-डे सामन्यात 2 षटकार मारत वन-डेतील 215 षटकार पूर्ण केले. त्यामुळे तो भारताकडून वनडेत सर्वाधिक षटकार मारण्याच्या यादीत धोनीसह अव्वल क्रमांकावर आला आहे. धोनीनेही भारताकडून वनडेत 215 षटकार मारले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
–सांगली एक्सप्रेस काही थांबेना! स्मृती मंधानाची तुफानी फटकेबाजी
–हिटमॅन रोहित शर्मा आणि मिताली राजबरोबर घडणार खास योगायोग
–आयसीसी महिला टी२० विश्वचषक२०२० च्या वेळापत्रकाची घोषणा