न्यूझीलंड आणि भारत यांच्यात रविवारी (27 नोव्हेंबर) हॅमिल्टन येथे मालिकेतील दुसरा वनडे सामना खेळला गेला. जो पावसामुळे रद्द झाला, मात्र या सामन्यासाठी झालेल्या नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडच्या बाजूने लागला होता. कर्णधार केन विलियम्सन याने भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले होते. भारताच्या डावाचा 4.5 षटकांचा खेळ झाला असता पावसाला सुरूवात झाली, नंतर काही वेळाने पुन्हा एकदा पाऊस झाल्याने खेळ थांबवण्यात आला. या सामन्यात संजू सॅमसन हा मैदानावर दिसला, मात्र तो भारताच्या अंतिम अकराचा भाग नाही. नेमके काय प्रकरण हे जाणून घेऊ.
संजू सॅमसन (Sanju Samson) या वर्षात भारताकडून सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू. त्याचबरोबर पहिल्या दहा वनडे डावांमध्ये सर्वाच्च सरासरी असणारा भारतीय. हे दोन मोठे विक्रम नोंदवून सुद्धा त्याला संघात जागा न मिळणे हे आश्चर्यकारक ठरले. दुसऱ्या वनडेत त्याला अंतिम अकरामधून वगळले गेले.
सीडन पार्कवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात अनेकदा पावसाने व्यत्यय आणला असून ग्राउंड स्टाफला काही भारतीय खेळाडूंनी मदत केली. त्यामध्ये सॅमसनबरोबर सूर्यकुमार यादव याचा समावेश होता. आयपीएलचा संघ राजस्थान रॉयल्स यांनी त्या दोघांचा व्हिडिओ ट्वीटवर शेयर केला आहे.
Sanju Samson. 💗pic.twitter.com/QxtQMz4188
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) November 27, 2022
भारताचा कर्णधार शिखर धवन याने सहाव्या गोलंदाजी पर्यायासाठी सॅमसनच्या जागी दीपक हुडा याला संघात घेतले. त्याचा हा निर्णय अनेक चाहत्यांना आवडला नाही. यामुळे त्यांनी सोशल मीडियावर त्याचा राग व्यक्त केला. NZvIND: Sanju Samson & Suryakumar Yadav Helps Ground Staff, Rajasthan Royals Tweet
दुसऱ्यांदा खेळ सुरू झाला तेव्हा भारताने धवनची विकेट लवकरच गमावली. तो 10 चेंडूत 3 धावा करत मॅट हेन्री याचा बळी ठरला. खेळपट्टीवर शुबमन गिल आणि सूर्यकुमार यादव उपस्थित होते. गिलने 42 चेंडूत 4 चौकार आणि एका षटकाराच्या सहय्याने नाबाद 45 धावा केल्या आहेत, दुसरीकडे सूर्यकुमार 25 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकार खेचत नाबाद 34 धावा केल्या आहेत. पावसाचा जोर वाढल्याने सामना रद्द झाला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
संजू सॅमसनच्या नावावर वनडेत ‘हे’ दोन जबरदस्त विक्रम, तरीही का केले जाते दुर्लक्ष?
ISL: बंगळुरू एफसीची पराभवाची मालिका खंडित झाली; गोव्याला नमवून केली पन्नासाव्या विजयाची नोंद