न्यूझीलंड आणि भारत यांच्यात रविवारी (27 नोव्हेंबर) हॅमिल्टन येथे मालिकेतील दुसरा वनडे सामना खेळला जात आहे. या सामन्यासाठी नाणेफेक झाली असता जसे भारताचा कर्णधार शिखर धवन याने अंतिम अकरा खेळाडूंची नावे सांगितली आणि पुन्हा एकदा संजू सॅमसन याला अंतिम अकरामध्ये स्थान मिळाले नाही. यामुळे चाहत्यांनी सोशल मीडियावर राग व्यक्त केला आहे. तसेच यामध्ये सॅमसनची वनडेतील आकडेवारी पाहूया.
संजू सॅमसन (Sanju Samson) याच्या नावावर वनडे क्रिकेटमध्ये दोन बलाढ्य विक्रमांची नोंद आहे. त्याने 2022मध्ये भारताकडून आतापर्यंत वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार खेचले आहेत. त्याने 14 षटकार मारले असून त्याच्यानंतर श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याचा क्रमांक लागतो, त्याने 10 षटकार मारले आहेत. 9 षटकारांसह तिसऱ्या क्रमांकावर शुबमन गिल (Shubman Gill) आहे.
त्याचबरोबर वनडेच्या पहिल्या 10 डावांत सर्वोच्च सरासरी पाहिली तर भारतीय खेळाडूंमध्ये सॅमसनच पहिल्या स्थानावर विराजमान आहे. त्याने 10 डावांमध्ये 66च्या सरासरीने 330 धावा केल्या आहेत. तसेच त्याने दोन अर्धशतकी खेळी केल्या आणि त्याचा स्ट्राईक रेट 104.76 राहिला आहे.
पहिल्या 10 वनडेच्या डावांमध्ये भारताकडून दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम सरासरी गिलच्या नावावर आहे. त्याने 62.8च्या सरासरीने धावा केल्या आहेत. 54 सरासरीसह तिसऱ्या स्थानावर केदार जाधव आहे. Indian player with highest average in first 10 innings in ODIs
सॅमसनने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत 38 चेंडूत 36 धावा केल्या होत्या. याच सामन्यात रिषभ पंत 23 चेंडूत 15 धावा करत बाद झाला होता. या सामन्यात सॅमसन जेव्हा फलंदाजीला आला तेव्हा भारताची स्थिती 160 धावांवर 4 विकेट्स अशी होती. त्यानंतर त्याने अय्यरच्या साथीने धावसंख्या 254 पर्यंत नेली. त्याने अय्यरसोबत पाचव्या विकेटसाठी 77 चेंडूत 94 धावांची भागीदारीही केली होती.
न्यूझीलंडच्या दौऱ्यातील दुसरा वनडे सामना हॅमिल्टन येथे खेळला जात असून पावसामुळे सामना काही काळासाठी थांबवला गेला होता. संघात अतिरिक्त गोलंदाज हवा यासाठी सॅमसनला बसवले गेले असे समजते, मात्र तरीही त्याच्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले गेले. nzvind second odi sanju samson is not in india playing eleven
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
क्रिकेटमध्ये 8 वर्षांपूर्वी घडली होती ‘ती’ वाईट घटना, ज्यामुळे हेलावले होते संपूर्ण क्रिकेटजगत
ISL: बंगळुरू एफसीची पराभवाची मालिका खंडित झाली; गोव्याला नमवून केली पन्नासाव्या विजयाची नोंद