सध्या भारतीय पुरूष क्रिकेट संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारत तीन सामन्यांची टी20 मालिका आणि तेवढ्याच सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. या दौऱ्यातील पहिला टी20 सामना पावसामुळे रद्द झाला, तर दुसरा सामना रविवारी (20 नोव्हेंबर) माउंट माउंगनुई येथे खेळला गेला. या सामन्यात भारताने मैदानावर पाऊल ठेवताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
क्रिकेटमध्ये खेळाडू वैयक्तिक विक्रम आपल्या नावावर करतात, आता भारतानेच एक अनोख्या विक्रमाची नोंद आपल्या नावावर केली आहे. न्यूझीलंड विरुद्ध भारत (NZvIND) तीन सामन्यांची टी20 मालिका खेळत आहे. दुसरा सामना खेळायला जेव्हा भारत मैदानात आला तेव्हा तो त्यांचा यावर्षीचा 62वा आंतरराष्ट्रीय सामना ठरला. हा विक्रम करताना भारताने ऑस्ट्रेलियाला मागे टाकले आहे. ज्यांनी 2009 मध्ये क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये मिळून 61 आंतरराष्ट्रीय सामने खेळले होते.
एका वर्षात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारे संघ या यादीत श्रीलंका तिसऱ्या स्थानावर आहे. त्यांनी 2017मध्ये 57 सामने खेळले होते, तर भारताने 2007मध्ये 55 सामने खेळले होते. या विक्रमाला ऑस्ट्रेलियाने 2009मध्ये तोडले होते. पाकिस्तानने 2013मध्ये 54 सामने खेळले होते आणि श्रीलंकेनेही 2012मध्ये तेवढेच सामने खेळले होते. यामुळे भारत आता सर्वांच्या पुढे गेला आहे.
भारत न्यूझीलंड दौऱ्यात टी20 मालिका हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या नेतृत्वाखाली खेळत आहे, कारण टी20 विश्वचषकानंतर नियमित कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली (Virat Kohli) यांच्यासह अनेकांना विश्रांती दिली आहे. त्यामुळे संघात अनेक नवे चेहरे दिसत आहेत. त्याचबरोबर संघाचे मुख्य प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण आहेत. या टी20 मालिकेनंतर तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाईल. ज्यामध्ये भारताचे नेतृत्व पुन्हा एकदा शिखर धवन करणार आहे. Teams who have played most international matches in a single year
एका वर्षात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारे संघ-
62* – भारत (2022)
61 – ऑस्ट्रेलिया (2009)
57 – श्रीलंका (2017)
55 – भारत (2007)
54 – पाकिस्तान (2013)
54 – श्रीलंका (2012)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
यार मिल गये! रांचीला येताच केदार पोहोचला माहीच्या फार्म हाऊसवर; पाहा खास छायाचित्रे
T20 WC: सेमीफायनलमध्ये भारताच्या पराभवाचे कारण बॉलिंग नाहीतर बॅटिंग, इंग्लंडच्या खेळाडूचे चकित करणारे विधान