राजस्थान रॉयल्सने शुक्रवारी (२७ मे) रात्री रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला धूळ चारली आणि अंतिम सामन्यात स्थान पक्के केले. आयपीएल २०२२ चा दुसरा क्वालिफायर सामना अहमदाबादमध्ये खेळला गेला, जो राजस्थानने ७ विकेट्सने जिंकला. राजस्थानचा सलामीवीर जोस बटलरने या सामन्यात धमाकेदार प्रदर्शन केले, पण त्यांच्या गोलंदाजांचे प्रदर्शन देखील उल्लेखनीय होते. वेस्ट इंडीजचा ओबेड मॅकॉयविषयी राजस्थानचा प्रशिक्षक कुमार संगाकाराने मोठा खुलासा केला.
राजस्थान रॉयल्ससाठी प्रसिद्ध कृष्णा आणि ओबेड मॅकॉय (Obed McCoy) यांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या. कृष्णाने चार षटकात २२ धावा, तर मॅकॉयने ४ षटकात २३ धावा खर्च करून या विकेट्स घेतल्या. या दोघांच्या कामगिरीमुळे आरसीबीला अपेक्षित धावसंख्या उभी करता आली नाही. आरसीबीने मर्यादित २० षटकांमध्ये ८ विकेट्सच्या नुकसानावर १५७ धावा केल्या.
गोलंदाज मॅकॉयची आई तिकडे वेस्ट इंडीजमध्ये आजारी आहे, पण तो स्वतः राजस्थानला विजेतेपद जिंकवून देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहे, अशी माहिती प्रशिक्षक कुमार संगकारा (Kumar Sangakkara) याने दिली. सामना संपल्यानंतर संगकाराने ही महत्वाची माहिती दिली. तो म्हणाला की, “मॅकॉयची आई वेस्ट इंडीजमध्ये खूप आजारी आहे आणि त्याला या सर्व बाबींशी झगडावे लागत आहे. त्याची आई आता ठीक होत आहे.”
दरम्यान, उभय संघातील या सामन्याचा विचार केला, तर आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना १५८ धावांचे लक्ष्य उभे केले होते. यामध्ये त्यांचा वरच्या फळीतील फलंदाज रजत पाटीदारने सर्वाधिक ५८ धावांचे योगदान दिले. कर्णधार फाफ डू प्लेसिस (२५) आणि ग्लेन मॅक्सवेल (२४) स्वस्तात बाद झाले. सलामीवीर विराट कोहलीने (७) देखील चाहत्यांची पुन्हा निराशा केली.
प्रत्युत्तरात राजस्थानची जेव्हा फलंदाजी आली, तेव्हा सलामीवीर जोस बटलरने हंगामातील त्याचे चौथे शतक पूर्ण केले. त्याने अवघ्या ६० चेंडूत नाबाद १०६ धावा केल्या. यामध्ये त्याच्या १० चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता. कर्णधार संजू सॅमसन (२३) आणि यशस्वी जयस्वाल (२१) यांनी बटलरची चांगली साथ दिली. राजस्थानने ३ विकेट्सच्या नुकसानावर आणि १८.१ षटकात सामना जिंकला. आता २९ मे रोजी अंतिम सामन्यात राजस्थान आणि गुजरात संघ आमने सामने असतील.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
IPL Final । ‘उद्या रॉयल संघच जिंकेल फायनल’, राजस्थानच्या गोटातील दिग्गज खेळाडूची मोठी भविष्यवाणी
बटलरने विलियम्सनला मागे टाकलेच, पण आता वॉर्नरचा ६ वर्ष जुना ‘हा’ विक्रमही धोक्यात
राजस्थान दुसऱ्यांदा खेळणार IPL फायनल! पाहा सर्वाधिकवेळा अंतिम सामना खेळणाऱ्या संघांची संपूर्ण यादी