क्रिकेट हा आकडेवारीचा खेळ आहे. या खेळात आकडेवारीला सर्वात जास्त महत्त्व आहे. खेळाडू किती दमदार आहे, हे पाहायचे असेल, तर सर्वप्रथम त्याची आकडेवारी पाहिली जाते. जागतिक क्रिकेटमध्ये असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांची आकडेवारी पाहिली, तर समजते की, त्यांना दिग्गज का म्हटले जाते. या यादीत भारताचा विस्फोटक फलंदाज विराट कोहली याचाही समावेश होतो. विराटने वनडे क्रिकेटमध्ये अशी काही कामगिरी केली आहे की, ज्यामुळे तो भारतीय खेळाडूंच्या यादीत अव्वलस्थानी आहे. काय आहे ती कामगिरी चला तर जाणून घेऊयात…
नुकताच भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील अखेरचा सामना बुधवारी (दि. 22 मार्च) खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 270 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून विराट कोहली (Virat Kohli) याने अर्धशतक झळकावलं. त्याने यादरम्यान 72 चेंडूंचा सामना करत 54 धावा केल्या. या धावा करताना त्याने 1 षटकार आणि 2 चौकारही मारले. मात्र, विराटचे हे अर्धशतक व्यर्थ ठरले. भारताला 21 धावांनी पराभव पत्करावा लागला. असे असले, तरीही विराटने एक खास कामगिरी केली.
विराट कोहलीचा पराक्रम
विराट कोहली याचा हा 265वा वनडे डाव होता. या सामन्यानंतर विराटची वनडेतील जी सरासरी आहे, ती भारताच्या इतर दिग्गज खेळाडूंपेक्षाही जास्त आहे. तो 265 वनडे डावांनंतर सर्वाधिक सरासरी असणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत अव्वलस्थानी आहे. विराटची वनडेतील सरासरी ही 57.32 इतकी आहे. विराटनंतर या यादीत दुसऱ्या स्थानी एमएस धोनी (MS Dhoni) आहे. धोनीची 265 वनडे डावांनंतरची सरासरी ही 51.9 इतकी होती. त्यानंतर तिसऱ्या स्थानी सचिन तेंडुलकर असून त्याची सरासरी 43.6 इतकी होती. चौथ्या स्थानावरील सौरव गांगुलीची सरासरी 41.2 इतकी होती. पाचव्या स्थानावरील राहुल द्रविडची सरासरी 40.2 इतकी होती. याव्यतिरिक्त सहाव्या स्थानी मोहम्मद अझरुद्दीन असून त्यांची 38.2च्या सरासरी होती. तसेच, सातव्या स्थानी असलेल्या युवराज सिंग याची 265 डावांनंतरची सरासरी ही 36.5 इतकी होती.
तब्बल 265 वनडे डावांनंतर सर्वाधिक सरासरी असणारे भारतीय खेळाडू
57.3- विराट कोहली*
51.9- एमएस धोनी
43.6- सचिन तेंडुलकर
41.2- सौरव गांगुली
40.2- राहुल द्रविड
38.2- मोहम्मद अझरुद्दीन
36.5- युवराज सिंग
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताचा दारुण पराभव होताच दिग्गजाच्या विधानाने खळबळ; म्हणाला, ‘टीम इंडियाला रस्त्यासारख्या सपाट…’
आयपीएल 2023पूर्वी KKRला धक्क्यावर धक्के! कॅप्टन अय्यरनंतर ‘हा’ वेगवान गोलंदाजही दुखापतग्रस्त