एकदिवसीय सामन्यांमध्ये ३०० चा स्कोर आता खूपच सामान्य बाब झाली आहे. आधी हा स्कोर जिंकण्यासाठी आवश्यक मानला जात होता, पण आजकाल हा सुद्धा स्कोर पुरेसा नसतो. एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३०० चा स्कोर सगळ्यात आधी इंग्लंडने भारताविरुद्ध १९७५ च्या विश्वचषकामध्ये बनवला होता.
तर मार्च २००६ पर्यंत कोणत्याच संघाने एकदाही ४०० चा स्कोर केला नव्हता. परंतु २००६ नंतर आतापर्यंत २० वेळा ४०० पेक्षा जास्त स्कोर बनवला गेला आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा ४०० चा स्कोर बनविला होता आणि त्याच सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने सुद्धा या आव्हानाचा पाठलाग करत इतिहास रचला होता. सर्वाधिक स्कोर करण्याचा विक्रम इंग्लंडच्या (४८१/६ विरुद्ध ऑस्ट्रेलिया) नावावर आहे.
भारताने श्रीलंकेविरुद्ध डिसेंबर २०१७ मध्ये झालेल्या एकदिवसीय मालिकेमध्ये ३०० चा स्कोर करण्याचे शतक केले होते. तेव्हा असा पराक्रम करणारा भारत पहिलाच संघ बनला होता. आताचा भारतीय संघाचा तो दबदबा कायम आहे.
चला बघूया आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये कोणत्या संघाने किती वेळा ३०० चा स्कोर बनवला आहे:
१. भारत – १२० वेळा
भारताने आतापर्यंत विक्रमी १२० वेळा ३०० किंवा त्यापेक्षा जास्त स्कोर बनवला आहे. यामध्ये भारताने ५ वेळेस ४०० चा स्कोर पार केला आहे. भारताने प्रथम १५ एप्रिल, १९९६ मध्ये शारजाह येथे पाकिस्तान विरुद्ध ३०० चे आकडा पार केला होता. भारताने त्या सामन्यामध्ये ३०५/५ चा स्कोर बनवत पाकिस्तानला २८ धावांनी मात दिली होती. भारताने ४०० चा स्कोर प्रथम २००७ विश्वचषकमध्ये बर्मुडाविरुद्ध १९ मार्चला पोर्ट ऑफ स्पेनमध्ये बनवला होता. त्या सामन्यामध्ये भारताने ४१३/५ धावा करत २५७ धावांनी विजय मिळाला होता. सर्वात जास्त धावा भारताने वेस्टइंडीज विरोधात (८ डिसेंबर २०११ रोजी ४१८/५) केल्या आहेत.
२. ऑस्ट्रेलिया – १११ वेळा
ऑस्ट्रेलियाने पहिल्या वेळेस ३०० चा स्कोर जून १९७५ ला श्रीलंकेविरुद्ध बनवला होता. त्या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाने ३२८/५ हा स्कोर करत श्रीलंकेला ५२ धावांनी हरविले होते. त्यांचा एका सामन्यामध्ये सर्वाधिक स्कोरचा विक्रम ४३४/४ चा आहे, जो त्यांनी १२ मार्च २००६ ला दक्षिण आफ्रिकेविरोधात जोहान्सबर्गमध्ये बनवला होता. ऑस्ट्रिलयाने आतापर्यंत दोन वेळा ४०० धावांचा टप्पा ओलांडला आहे. त्यांनी आतापर्यंत १११ वेळा ३०० किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
३. दक्षिण आफ्रिका – ८६ वेळा
दक्षिण आफ्रिकेने पहिल्यावेळेस ३०० चा स्कोर ११ डिसेंबर १९९४ ला न्यूझिलंडविरोधात बनवला होता. त्या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने ३१४/७ धावा करत न्यूझीलंडला ८१ धावांनी मात दिली होती. त्यांचा सर्वाधिक धावांचा विक्रम ४३९/२ चा आहे, जो त्यांनी १८ जानेवारी २०१५ ला वेस्टइंडीजविरुद्ध केला होता. दक्षिण आफ्रिकेने आतापर्यंत विक्रमी ६ वेळा ४०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्यांनी आतापर्यंत ८६ वेळा एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
४. पाकिस्तान – ८४ वेळा
पाकिस्तान या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्यांनी आतापर्यंत ८४ वेळा ३०० धावांचा आकडा फलकावर नोंदवला आहे. पाकिस्तानने पहिल्यावेळेस ३०० चा स्कोर ११ जून १९७५ ला श्रीलंकेविरुद्ध बनवला होता. पाकिस्तानने ३३०/६ धावा करत त्या सामन्यामध्ये श्रीलंकेला १९२ धावांच्या सर्वाधिक फरकाने हरविले होते. एका सामन्यामध्ये सर्वाधिक स्कोरचा विक्रम ३९९/१ चा आहे, जो त्यांनी २० जुलै २०१८ ला झिंबाब्वेविरुद्ध बनवला होता.
५. इंग्लंड – ८३ वेळा
इंग्लंडने पहिल्यावेळेस ३०० चा स्कोर ७ जून १९७५ ला भारताविरुद्ध बनवला होता. इंग्लंडने ३३४/४ धावा करत त्या सामन्यामध्ये भारताला २०२ धावांच्या सर्वाधिक फरकाने हरविले होते. एका सामन्यामध्ये सर्वाधिक स्कोरचा विक्रम ४८१/२ चा आहे, जो इंग्लंडने १९ जून २०१८ ला ऑस्ट्रेलियाविरुद्ध बनवला होता. हा स्कोर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय स्तरावरचा सर्वाधिक स्कोरचा विश्वविक्रम आहे. इंग्लंडने आतापर्यंत ४ वेळा ४०० चा स्कोर बनवला आहे. आतापर्यंत त्यांनी ३०० किंवा त्यापेक्षा जास्त धावा करण्याचा पराक्रम ८३ वेळा केला आहे.
६. श्रीलंका – ७४ वेळा
श्रीलंकेने पहिल्यावेळेस ३०० चा स्कोर फेब्रुवारी १९९२ ला झिंबाब्वेविरुद्ध बनवला होता. श्रीलंकेने ३१३/७ धावा करत त्या सामन्यामध्ये झिंबाब्वेला ३ विकेट्सनी हरविले होते. एका सामन्यामध्ये सर्वाधिक स्कोरचा विक्रम ४४३/९ चा आहे, जो त्यांनी ४ जुलै २००६ ला नेदरलँडविरुद्ध बनवला होता. श्रीलंकेने आतापर्यंत २ वेळा ४०० चा स्कोर पार केला आहे.
७. न्यूझीलंड – ६२ वेळा
न्यूझीलंड संघाने ६२ वेळा ३०० चा स्कोर केला असून पहिल्यावेळेस ३०० चा स्कोर ७ जून १९७५ ला ईस्ट आफ्रिकेच्या विरुद्ध बनवला होता. न्यूजीलैंडने (३०९/५) त्या सामन्यामध्ये ईस्ट आफ्रिकेला १८१ धावांच्या सर्वाधिक फरकाने हरविले होते. एका सामन्यामध्ये सर्वाधिक स्कोरचा विक्रम ४०२/२ चा आहे, जो त्यांनी १ जुलै २००८ ला आयर्लंडविरोधात बनवला होता. न्यूझीलंडने आतापर्यंत एकाच वेळेस ४०० चा स्कोर बनवला आहे.
८. वेस्टइंडीज – ५० वेळा
वेस्टइंडीजने आतापर्यंत ५० वेळा ३०० चा स्कोर केला असून पहिल्यावेळेस ३०० चा स्कोर २२ फेब्रुवारी १९७८ ला ऑस्ट्रेलियाविरुद्ध बनवला होता. वेस्टइंडीजने ३१३/९ धावा करत त्या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाला ४४ धावांनी हरविले होते. एका सामन्यामध्ये सर्वाधिक स्कोरचा विक्रम ३८९ चा आहे, जो त्यांनी २७ फेब्रुवारी २०१९ ला इंग्लंडविरुद्ध बनवला होता.
९. झिंम्बाब्वे – २८ वेळा
झिंम्बाब्वेने २८ वेळा हा पराक्रम केला आहे. त्यांनी पहिल्यावेळेस ३०० चा स्कोर २३ फेब्रुवारी १९९२ ला श्रीलंकेविरुद्ध बनवला होता. श्रीलंकेने ३१३/७ धावा करत त्या सामन्यामध्ये झिंबाब्वेला ३ विकेटनी हरविले होते. एका सामन्यामध्ये सर्वाधिक स्कोरचा विक्रम ३५१/७ चा आहे, जो त्यांनी २९ जानेवारी २००९ ला केनियाविरुद्ध बनवला होता.
१०. बांगलादेश – २० वेळा
बांगलादेशने पहिल्यावेळेस ३०० चा स्कोर १७ मार्च २००६ ला केनियाविरुद्ध बनवला होता. बांगलादेशने ३०१/७ धावा करत त्या सामन्यामध्ये केनियाला १३१ धावांनी हरविले होते. एका सामन्यामध्ये सर्वाधिक स्कोरचा विक्रम ३३३/८ चा आहे, जो त्यांनी २७ फेब्रुवारी २०१९ ला ऑस्ट्रेलियाविरुद्ध केला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
तिन्ही वनडेत संधी मिळूनही केल्या फक्त ७४ धावा, भारताच्या ‘या’ फलंदाजांची वनडे कारकिर्द संपुष्टात?
विराटची वाढली चिंता! ‘हा’ प्रमुख खेळाडू होऊ शकतो आयपीएलमधून बाहेर