नुकताच रविवारी (दि. 11 जून) आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद 2023 स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघ आमने-सामने होते. हा सामना ऑस्ट्रेलियाने 209 धावांनी खिशात घातला. ही स्पर्धा संपताच क्रिकेटप्रेमींच्या नजरा आयसीसी वनडे विश्वचषक 2023वर लागल्या आहेत. ही स्पर्धा ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये खेळली जाईल. भारतीय संघ या स्पर्धेचे विजेतेपद पटकावण्याचा प्रयत्न करेल. कारण, भारताने मागील 10 वर्षांमध्ये एकही आयसीसी ट्रॉफी जिंकली नाहीये. अशात वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत कोणकोणते सामने जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट मैदानावर खेळले जाणार आहेत, याबाबत जाणून घेऊयात…
खरं तर, बीसीसीआयने जे वेळापत्रक तयार केले आहे, त्यानंतर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअम (Narendra Modi Stadium) येथे एक किंवा दोन नाहीत, तर चार सामने खेळले जाणार आहेत. यामध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) आणि विश्वचषक 2023 अंतिम सामन्याचा समावेश आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट मैदानावर चार मोठे सामने खेळले जातील, तेव्हा प्रेक्षकांंचा विश्वविक्रमही बनण्याची शक्यता आहे. एका आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात अद्याप 1 लाख प्रेक्षक पोहोचले नाहीयेत, पण हा विक्रम भारतात बनू शकतो. माध्यमांतील वृत्तांनुसार, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि भारतीय संघाला या मैदानावर प्रत्येकी 1 सामना खेळायचा आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, आयसीसी वनडे विश्वचषक 2023ची सुरुवात मागील अंतिम सामन्यात पोहोचणाऱ्या दोन संघांमध्ये खेळला जाईल. अशाप्रकारे इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघ आमने-सामने असतील. यानंतर दुसरा सामना याच मैदानावर भारत विरुद्ध पाकिस्तान संघात खेळला जाण्याचे वृत्त आहे. तिसरा सामना इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात पार पडेल, तर चौथा सामना वनडे विश्वचषक 2023चा (ODI World Cup 2023) अंतिम सामना असेल. महत्त्वाच्या सामन्यासाठी हेच स्टेडिअम सर्वोत्तम राहील. कारण, या सामन्यात एकसोबत 1 लाख रलोक सामना पाहू शकतील.
Main matches at Narendra Modi Stadium as per draft schedule in the World Cup. [Espn Cricinfo]
– England vs New Zealand
– India vs Pakistan
– Australia vs England
– Final pic.twitter.com/kqr7ZerR3d— Johns. (@CricCrazyJohns) June 12, 2023
भारताचा 10 वर्षांपासून आयसीसी ट्रॉफी वनवास
भारतीय संघाने अखेरची आयसीसी ट्रॉफी 2013मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रूपात पटकावली होती. त्यानंतर भारताने अनेकदा अंतिम सामन्यात धडक दिली, पण त्यांना विजय मिळवण्यात यश आले नाही. अशात ही स्पर्धा भारतासह इतर संघांसाठीही महत्त्वाची आहे. (ODI World Cup 2023 main matches at narendra modi stadium as per draft schedule in the icc cricket WC)
महत्वाच्या बातम्या-
“रोहितच्या नेतृत्वात आपण आयसीसी ट्रॉफी नाही जिंकू शकत”, माजी प्रशिक्षकाचे परखड मत
भारताच्या पराभवामागील खरे व्हिलन ‘हे’ 2 खेळाडू! नेटकरीही म्हणाले, ‘बीसीसीआयने त्यांना घेतलंच कशाला?’