पाकिस्तान आणि नेदरलॅंड्स हे दोन्ही संघ शुक्रवारी (6 ऑक्टोबर) वनडे विश्वचषक 2023 मधील आपला पहिला सामना खेळला गेला. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात पाकिस्तानने उत्कृष्ट सांघिक कामगिरी करत 81 धावांनी विजय मिळवला. यासह पाकिस्तानने स्पर्धेत आपली सुरुवात विजयाने केली. नेदरलँड्स संघासाठी अष्टपैलू बास डी लिडे याने एकतर्फी झुंज देताना चार बळी व अर्धशतक झळकावले.
या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर नेदरलँड्स संघाने पाकिस्तानला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. मात्र, पाकिस्तानने आपले पहिले तीन बळी केवळ 38 धावांवर गमावले. त्यानंतर अनुभवी मोहम्मद रिझवान व सौद शकील यांनी 120 धावांची भागीदारी केली. दोघांनी प्रत्येकी 68 धावा केल्या. त्यानंतर नवाज याने 43 धावा करून पाकिस्तानला 286 पर्यंत पोहोचवले. नेदरलँड्स संघासाठी डी लिडेने सर्वाधिक चार बळी मिळवले.
या धावांचा पाठलाग करताना नेदरलँड्सने आपले पहिले दोन बळी लवकर गमावले. मात्र, त्यानंतर विक्रमजीत सिंग व डी लिडे यांनी संघाचा डाव सावरला. सिंग याने 52 धावांची खेळी केली. डी लिडे याने एका बाजूने संघर्ष करताना 67 धावांची खेळी केली. त्यानंतर आलेले इतर फलंदाज फारशी चांगली कामगिरी करू न शकल्याने संघाचा डाव 205 धावांवर संपुष्टात आला. पाकिस्तान संघासाठी हारिस रौफ याने सर्वाधिक तीन बळी मिळवले. तसेच इतर सर्व गोलंदाजांनी बळी आपल्या नावे केले.
(ODI World Cup Pakistan Beat Netherlands Start Campaign With Win Bass De Leede Shines)
महत्वाच्या बातम्या –
20 वर्षांपूर्वी बापाने केलेली कामगिरी बास डी लीडेने पुन्हा प्रत्यक्षात उतरवली, मिळवले दिग्गजांच्या यादीत स्थान
शुबमन गिल ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार नाही? प्रशिक्षक राहुल द्रविडने स्वतः दिली माहिती





टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये रंगणार दिग्गजांची मैफल! विश्वचषकासाठी ‘स्टार’ कॉमेंट्री पॅनेलची घोषणा