वनडे विश्वचषक 2023 चा 11 सामना शुक्रवारी (13 ऑक्टोबर) बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला गेला. या सामन्यात बांगलादेश संघाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाले होते. खराब सुरुवातीनंतर बांगलादेश संघाला शाकिब आणि मुशफिकूर रहीम यांनी संघाला अडचणीतून बाहेर काढले. त्यानंतर अनुभवी महमदुल्लाह याने अखेरच्या षटकांमध्ये काही मोठे फटके मारत संघाला 245 पर्यंत मजल मारून दिली.
बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यातील हा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळला गेला. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून बांगलादेशला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. कर्णधार केन विलियम्सनने घेतलेला हा निर्णय अगदी योग्य ठरला. ट्रे़ंट बोल्ट याने पहिल्याच चेंडूवर लिटन दास याला बाद केले. मेहदी हसन, शांतो हे प्रमुख फलंदाज संघाची धावसंख्या अवघी 56 असताना बांगलादेशच्या चार महत्वपूर्ण विकेट पडल्या होत्या. पाचव्या विकेटसाठी शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) आणि मुशफिकूर रहीम (Mushfiqur Rahim) यांच्यात 108 चेंडूत 96 धावांची भागीदारी पार पडली.
शाकिब 40 तर रहीम 66 धावांवर बाद झाला. त्यानंतर अनुभवी महंमदुल्ला याने संघाची जबाबदारी घेतली. त्याने अखेरपर्यंत नाबाद राहत 41 धावा करत संघाला 245 पर्यंत पोहोचवले. न्यूझीलंड संघासाठी सर्व गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत बळी मिळवले.
(ODI World Cup Shakib Rahim Partnership Save Bangladesh Newzealand Have 246 Target)
महत्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलिया vs दक्षिण आफ्रिका सामन्यात गोंधळ! मार्कस स्टॉयनिस आणि स्टीव स्मिथच्या विकेटमुळे वाद
IND vs PAK सामन्यापूर्वी होणार भव्य सोहळा, प्रसिद्ध बॉलीवूड गायक दाखवणार आपल्या आवाजाची जादू