---Advertisement---

नागपुरात ऑस्ट्रेलियाच देणार टीम इंडियाला सरप्राईज! 35 वर्षांपूर्वीची रणनिती पुन्हा आजमावणार

On: बुधवार, फेब्रुवारी 8, 2023 3:53 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया (INDvAUS) यांच्या दरम्यानच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला 9 फेब्रुवारीपासून नागपूर येथे सुरुवात होत आहे. हा सामना जिंकत विजयी सुरुवात करण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल. सामना सुरु होण्यास अद्याप काही तासांचा अवधी शिल्लक असताना, ऑस्ट्रेलियन संघाने भारतीय संघाला आश्चर्याचा धक्का देण्याचा निर्णय घेतला आहे.

बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2023 मधील पहिला सामना नागपूर येथील व्हीसीए स्टेडियमवर खेळला जाईल. मागील 3-4 दिवसांपासून या सामन्यात वापरली जाणारी खेळपट्टी चर्चेत आहे. ही खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना अनुकूल असेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामूळे या सामन्यात भारतीय संघ तीन फिरकीपटूंना संधी देऊ शकतो. दुसरीकडे पाहुणा ऑस्ट्रेलिया संघ देखील अशीच काहीशी रणनीती आखताना दिसत आहे.

सध्या ऑस्ट्रेलियन संघात फिरकीची जबाबदारी दिग्गज नॅथन लायन सांभाळतो. तो आतापर्यंत भारतात देखील चांगलाच यशस्वी ठरला आहे. मात्र, नागपूरची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी अधिकच पोषक असल्यास, ऑस्ट्रेलियन संघ युवा ऑफस्पिनर टॉड मर्फी याला पदार्पणाची संधी देऊ शकतो. असे झाल्यास ऑस्ट्रेलियन संघ 35 वर्षानंतर प्रथमच दोन प्रमुख ऑफ स्पिनरसह मैदानात उतरेल. यापूर्वी ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानविरुद्ध 1988 मध्ये पीटर टेलर व टीम मे या दोन फिरकीपटूंना एकाच वेळी संघात खेळवले होते.

लायन व मर्फी यांच्यासह अष्टपैलू ऍश्टन एगर हा देखील डाव्या हाताने फिरकी गोलंदाजी करतो. त्यामुळे भारताने तीन फिरकीपटू उतरवल्यास ऑस्ट्रेलिया देखील त्याच रणनीतीने खेळताना दिसण्याची दाट शक्यता आहे ‌  ‌‌

पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाचा संभाव्य संघ-

डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅब्युशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रेविस हेड, ऍलेक्स केरी‌, ऍश्टन एगर, पॅट कमिन्स (कर्णधार), टॉड मर्फी, नॅथन लायन व स्कॉट बोलॅंड.

(Off Spinner Todd Murphy Might Debute For Australia In Nagpur Test)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---