आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी आता जवळपास 2 आठवड्यांचा कालावधी उरला आहे. या स्पर्धेचे आयोजन भारतात 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. अशात या स्पर्धेपूर्वी क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. या वनडे विश्वचषकाचे अँथेम साँग अधिकृतरीत्या रिलीज करण्यात आले आहे. ‘दिल जश्न बोले’ असे अँथेम साँगचे नाव असून यामध्ये बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग मुख्य भूमिकेत आहे. या गाण्याला बॉलिवूडचा प्रसिद्ध कंपोजर प्रीतम याने संगीत दिले आहे. या अँथेम साँगमध्ये अनेक सोशल मीडिया स्टार्सचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, यात युझवेंद्र चहल याची पत्नी धनश्री वर्मा हिचाही समावेश आहे. मात्र, या गाण्यात कोणत्याही आजी-माजी क्रिकेटपटूंचा समावेश नसल्याने काही चाहते निराशही झाले आहेत.
काय आहे अँथेम साँगमध्ये?
‘दिल जश्न बोले’ (Dil Jashn Bole) हे अँथेम चाहत्यांना वनडे एक्सप्रेसमधून भारताच्या एका खास यात्रेवर घेऊन जात आहे. ज्यामध्ये आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या विश्वचषकापूर्वी कधीही पाहायला न मिळालेला जल्लोष सामील आहे. एका रेल्वेमध्ये क्रिकेटप्रेमी मजा घेत आहेत, आणि क्रिकेट खेळताना दिसत आहेत. हे अँथेम आयसीसीची ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्ट्सने तयार केले आहे, जे आता आयसीसीच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर उपलब्ध आहे.
कलाकार काय म्हणाले?
‘दिल जश्न बोले’ या वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) स्पर्धेच्या अँथेम साँग (Anthem Song) लाँचिंगविषयी रणवीर सिंग (Ranveer Singh) म्हणाला, “स्टार स्पोर्ट्स कुटुंबाचा एक भाग आणि कट्टर क्रिकेटप्रेमीच्या रूपात आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023साठी हे अँथम लाँचचा भाग बनणे वास्तवात सन्मानाची बाब आहे. हा एक उत्सव आहे. तो खेळ, जो आपल्या सर्वांना आवडतो.”
DIL JASHN BOLE! #CWC23
Official Anthem arriving now on platform 2023 📢📢
Board the One Day Xpress and join the greatest cricket Jashn ever! 🚂🥳
Credits:
Music – Pritam
Lyrics – Shloke Lal, Saaveri Verma
Singers – Pritam, Nakash Aziz, Sreerama Chandra, Amit Mishra, Jonita… pic.twitter.com/09AK5B8STG— ICC (@ICC) September 20, 2023
दुसरीकडे, कंपोजर प्रीतम म्हणाला, “क्रिकेट ही भारताची सर्वात मोठी आवड आहे. आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या विश्वचषकासाठी ‘दिल जश्न बोले’ची रचना करणे माझ्यासाठी खूपच सन्मानाची बाब आहे. हे गाणे फक्त 1.4 अब्ज भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी नाही, तर संपूर्ण जगातील भारतात येण्यासाठी आहे. या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या उत्सवाचा भाग बना.”
भारताचा सामना कधी?
भारतीय संघ 8 ऑक्टोबरपासून विश्वचषक 2023 स्पर्धेतील आपल्या अभयानाची सुरुवात करेल. भारतीय संघ विश्वचषकातील आपला पहिला सामना चेन्नई येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळेल. या सामन्यासाठी भारतीय क्रिकेटप्रेमी खूपच उत्सुक आहेत. (official cricket world cup 2023 anthem dil jashn bole release see here)
हेही वाचाच-
वर्ल्डकप तोंडावर असतानाच श्रीलंका क्रिकेटमध्ये खळबळ; दसून शनाका सोडणार कर्णधारपद!
‘विराटसाठी सचिनचा विक्रम मोडणे खूपच कठीण…’, भारताच्याच माजी क्रिकेटरचे लक्षवेधी भाष्य