सध्या विश्रांती घेत असलेल्या आणि कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या रवींद्र जडेजाला चाहते काही विसरत नाही. द भारत आर्मी या भारतीय क्रिकेटच्या फॅन्सच्या ग्रुपने ट्विटरवरून एक खास विडिओ शेअर करून रवींद्र जडेजासाठी एक खास गाणं म्हटलं आहे.
ओह रवी जडेजा! असे या गाण्याचे बोल असून सोशल मीडियावर ते चांगलंच व्हायरल झालं आहे. ज्या द भारत आर्मी या फॅन्स ग्रुपने हा विडिओ बनवला आहे त्यांच्यामते त्यांनी हा ग्रुप १९९९ साली स्थापन केला असून ते भारतीय संघाचे नंबर १ चे चाहते आहेत.
गेल्या काही वर्षांपासून भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा फॅन्समध्ये चांगलाच प्रसिद्ध आहे. त्याला चाहते आणि खेळाडू प्रेमाने सर म्हणतात. एकावेळी चांगली कामगिरी होत नसल्यामुळे त्याला सर म्हणून चिडवलं जायचं. पण आज त्याच संधीच त्याने सोनं केलं आहे.
जडेजाने आजपर्यत भारताकडून ३२ कसोटी सामने, १४० एकदिवसीय सामने आणि ४० टी२० सामने खेळले आहेत.
पहा ओह रवी जडेजाचा संपूर्ण विडिओ:
https://twitter.com/thebharatarmy/status/901881883449024512