क्रिकेटप्रेमींची एक हजारपेक्षाही जास्त दिवसांची प्रतिक्षा अखेर गुरुवारी (08 सप्टेंबर) संपली. या दिवशी भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात झालेल्या आशिया चषक 2022 च्या शेवटच्या सुपर-4 सामन्यात विराट कोहली याने झंझावाती शतक झळकावले. त्याच्या या शतकी खेळीच्या जोरावर भारताने अफगाणिस्तानला 101 धावांनी पराभूत केले आणि आशिया चषकाचा गोड शेवट केला.
क्रिकेटविश्वातील स्टार फलंदाजांपैकी एक विराटने दीर्घ काळानंतर शतक केल्याने एक वयोवृद्ध आजोबा त्याच्यापुढे नतमस्तक झाले. या आजोबांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हिडिओत दिसते की, विराट खणखणीत षटकार मारत त्याचे टी20तील पहिलेवहिले शतक पूर्ण करतो. तसेच हे त्याचे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 71 वे शतकही आहे. 2 वर्षे 10 महिने आणखी खोलात जाऊन सांगायचे तर, 1020 दिवसांनंतर विराटला शतक करताना पाहून संपूर्ण क्रिकेट आनंदी झाले. यावेळी दुबईच्या स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या चाहत्यांचा आनंदही गगनात मावेनासा झाला होता. स्टेडियमभर टाळ्यांचा आवाज घुमत होता.
याचवेळी स्टेडियममध्ये उपस्थित एका आजोबांनी सर्वांचे लक्ष वेधले. विराट एकीकडे शतकाचा जल्लोष साजरा करत असताना, ते आजोबा दोन्ही हात वर करून त्याला झुकून सलाम करताना दिसले. त्यांची ही कृती क्रिकेटप्रेमींच्या हृदयाला स्पर्श करून गेली. सोशल मीडियावर या आजोबांचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय.
https://twitter.com/rishabh2209420/status/1567897587696664576?s=20&t=Vw-Pgttywk-E_HJgT2qDHA
भारताचा मोठा विजय
दरम्यान भारतीय संघाने सुपर-4 फेरीतील सलग 2 सामने गमावल्याने त्यांचा आशिया चषकातील प्रवास अगोदरच संपुष्टात आला होता. अफगाणिस्तानविरुद्धचा सामना भारताचा शेवटचा सामना होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना विराटच्या शतकाच्या जोरावर भारतीय संघाने 212 धावा फलकावर लावल्या. या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा संघ 111 धावाच करू शकला. परिणामी भारताने 101 धावांच्या फरकाने हा सामना जिंकला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘अंतिम सामना खेळायचा होता पण…’, आशिया चषकातून बाहेर झाल्यानंतर केएल राहुलने व्यक्त केली खंत
आगामी टी20 विश्वचषकासाठी पाकिस्तानचा ‘मेंटर’ म्हणून ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाची नियुक्ती
डिविलियर्सला एक दिवसआधीच लागली होती विराटच्या शतकाची चाहूल; म्हणाला, ‘काल त्याला…’