भारतीय क्रिकेट संघाचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर एका दशकापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. पण चाहत्यांमध्ये त्याच्यासाठी असणारे प्रेम आणि वेडेपणा अद्याप कमी झाला नाहीये. आजही सचिनची एक झल पाहण्यासाठी चाहते काहीही करू शकतात. पण काही चाहते असेही आहेत, ज्यांना अपेक्षित नसताना समोरून सचिनचे दर्शन घडते. असाच एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे.
सचिन तेंडुलकर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा फलंदाज आहे. सचिन जोपर्यंत खेळपट्टीवर उपस्थित असेल, तोपर्यंत भारतीय संघ पराभूत होणार नाही, या आशा चाहत्यांच्या मनात नेहमी असायच्या. मास्टर ब्लास्टर नावाने ओळखला जाणारा सचिन मैदानात पाय टाकताच स्टेडियम ‘सचिन-सचिन’ या आवाडाने दुमदुमायचे. आज सचिन आंतरराष्ट्रीय क्रिकेटणधून निवृत्त होऊन बराच काळ लोटला आहे. पण त्याला असाच एक अनुभव विमान प्रवास करताना आला.
सचिन तेंडुलकर आणि त्याची पत्नी अंजली विमानातून प्रवास करत होते. चाहत्यांसाठीही सचिन आपल्यासोबत प्रवास करत आहे, हा एकप्रकारे धक्काच होता. सचिनने विमानात पाय टाकताच सर्वजण ‘सचिन… सचिन…’ असे म्हणू लागले. ड्रेसिंग रुममधून खेळपट्टीवर जाईवर्यंत सचिनने अनेकदा हा अनुभव घेतला आहे. पण विमान प्रवासात कदाचीत असा अनुभव येण्याची ही त्याची पहिलीच वेळ असावी. हा व्हिडिओ सध्या चर्चेत आहे.
When the entire flight turns into a stadium with Sachinnn Sachinnn Chants ???? @sachin_rt pic.twitter.com/fpXiDTvARA
— Sachin Tendulkar Fan Club (@OmgSachin) February 20, 2024
दरम्यान, सचिन नुकताच जम्मू कश्मीरला गेला होता. त्याची पत्नी अंजली आणि मुलकी सारा तेंडुलकर यादेखील त्याच्यासोबत होत्या. जम्मू कश्मीरमधील बॅट बनवणाऱ्या एका कारखाण्याला सचिनने भेट दिली. याठिकाणी त्याने अनेकांना ऑटोग्राफ देखील दिले.
सचिनच्या नावावर असणारे अनेक विक्रम आजही अबाधित आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केलेला 100 शतकांचा विक्रम, आजही कोणा दुसऱ्या खेळाडूला मोडता येईल, असे ठामपणे सांगता येत नाही. विराट कोहली हा विक्रम मोडण्यासाठी दावेदार आहे. विराटने वनडे क्रिकेटमधील सचिनच्या 49 शतकांचा विक्रम काही दिवसांपूर्वी मोडला. पण 100 शतके करणे विराटसाठीही सोपी गोष्ट नसेल. 24 वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळल्यानंतर सचिनने एकटा असा क्रिकेटपटू आहे, ज्याने 200 कसोटी आणि 460 वनडे सामने खेळले. (Old memories of Sachin became fresh, ‘Sachin-Sachin’ announcements on the flight)
महत्वाच्या बातम्या –
Ranji Trophy 2024 । हैदराबाद संघाची चांदी! प्रत्येक खेळाडूला मिळणार BMW कार
यशस्वी जयस्वालला द्विशतकांमुळे कसोटी क्रमवारीत झाला बंपर फायदा, केला आतापर्यंतचा मोठा रेकॉर्ड






