---Advertisement---

द्रविडच्या फलंदाजीचे अफलातून समालोचन करणाऱ्या डीन जोन्सचा व्हिडीओ व्हायरल

---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक डीन जोन्स यांचे 24 सप्टेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या 59 व्या वर्षी त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूच्या बातमीने संपूर्ण क्रिकेटविश्वला धक्का बसला आहे.

क्रिकेट चाहते या दिग्गज समालोचकाला विविध पोस्ट करत आदरांजली वाहत आहेत. तसेच ट्विट व फेसबुकवर त्यांचे जुने व्हिडीओही शेअर करत आहेत. सध्या अशाच एका पोस्टमध्ये एक जुना व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, जो सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते भारतीय क्रिकेटचे विश्लेषण करताना दिसत आहे. तसेच ते भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीची मुलाखत घेत आहेत.

2004 साली जेव्हा भारतीय संघ पाकिस्तान दौर्‍यावर गेला होता, तेव्हा डीन जोन्स यांनी राहुल द्रविडला सराव करताना पाहिले होते. पुढे त्यांनी याच द्रविडच्या खेळीचे अतिशय खास असे समालोचन केले होते.

डीन जोन्स यांचे क्रिकेट विश्वात मोठे चाहते होते. आपल्या अतिशय रोमांचक समालोचनातून त्यांनी हे चाहते कमावले होते. त्यांच्या अकाली जाण्याने मात्र चाहते हळहळले आहेत. त्यांच्या या उत्कृष्ट खेळाबद्दल आणि लाजवाब कमेंट्री बद्दल त्यांना कायम आठवले जाईल.

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---