क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना सुरू आहे.या सामन्यातील पहिल्या दिवशी(१२ ऑगस्ट ) भारतीय संघातील सलामीवीर फलंदाज केएल राहुलने तुफानी शतक झळकावले होते. तर दुसऱ्या दिवसातील (१३ ऑगस्ट) पहिल्याच षटकात तो बाद होऊन माघारी परतला.
केएल राहुलने दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी चौफेर फटकेबाजी करत नाबाद १२७ धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तो मोठी खेळी साकारणार अशी आशा व्यक्त केली गेली होती. परंतु, ऑली रॉबिन्सनने त्याच्या स्वप्नावर पाणी ओतले.केएल राहुल अवघ्या १२९ धावा करत माघारी परतला.
तर झाले असे की, अप्रतिम गोलंदाजी करत असलेल्या ऑली रॉबिन्सनला दुसऱ्या दिवसातील पहिले षटक टाकण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्याने या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर केएल राहुलला बाद करून इंग्लंड संघाचे सामन्यात पुनरागमन करून दिले. त्याने हाल्फ वॉली चेंडू टाकला. ज्यावर केएल राहुलने कव्हर ड्राईव्ह शॉट खेळला. परंतु, तो चेंडू थेट कव्हरच्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत असलेल्या डॉम सिब्लेने टिपला. केएल राहुलने या डावात १२ चौकार आणि १ षटकाराच्या साहाय्याने १२९ धावांची खेळी केली.(Ollie Robinson sent back kl rahul to the pavelian,watch video)
OUT! Robinson takes out the big one! 🔥
Rahul drives to cover on 129 ☝🏽Tune into Sony Six (ENG), Sony Ten 3 (HIN), Sony Ten 4 (TAM, TEL) & SonyLIV (https://t.co/AwcwLCPFGm ) now! 📺#ENGvINDOnlyOnSonyTen #BackOurBoys #KLRahul pic.twitter.com/2t71YDkI8J
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) August 13, 2021
भारताच्या पहिल्या डावात ३६४ धावा
भारताचा पहिला १२६.१ षटकात ३६४ धावांवर संपुष्टात आला आहे. भारताकडून पहिल्या डावात केएल राहुलने १२९ धावांची शतकी खेळी केली. तर रोहित शर्माने ८३ धावांची शतकी खेळी केली. त्याचबरोबर विराट कोहली (४२), रविंद्र जडेजा (४०) आणि रिषभ पंत (३७) यांनी छोटेखानी, पण महत्त्वपूर्ण खेळी केल्या. इंग्लंडकडून जेम्स अँडरसनने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या, तर ऑली रॉबिन्सन आणि मार्क वूडने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. मोईन अलीला १ विकेट मिळाली.
महत्त्वाच्या बातम्या –
‘फुल टू फिल्मी’ पद्धतीने राजस्थान रॉयल्सच्या ‘या’ क्रिकेटरचा झाला साखरपुडा, फोटो तुफान व्हायरल
‘तुझं टॅलेंट वाया घालवू नकोस, कोहलीकडून जरा शिक,’ पीटरसनने इंग्लंडच्या खेळाडूची घेतली शाळा
‘इंग्लंड संघाला सराव देताय का?’ सतत फ्लॉप ठरत असलेल्या रहाणे, पुजाराला नेटकऱ्यांनी केले ट्रोल